लिंपणगावला आरोग्य केंद्र उभारण्यायावे- विजय ओहोळ
By : Polticalface Team ,20-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणाऱ्या लिंपणगाव येथे आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय ओहोळ विशेष ग्रामसभेत केली आहे. बुधवारी 19 एप्रिल रोजी लिंपणगावच्या विशेष ग्रामसभेत श्री ओहोळ यांनी हा प्रश्न पोट तिडकीने मांडला. गावच्या सिध्देश्वर मंगल कार्यालयात सरपंच सौ शुभांगी ताई जंगले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली , याप्रसंगी श्री ओहोळ यांनी ग्रामसभेत सर्वांचेच लक्ष वेधले.
श्री ओहोळ यांनी या सभेत आपले मत मांडताना आणखी म्हणाले की,..लिंपणगावची लोकं संख्या सत्तारा हजार असुन, लिंपणगाव मध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे लोकांना काष्टी किंवा श्रीगोदा या ठिकाणी जावे लागते.,लोकसंख्याचा विचार करता , प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी परत ते पुढे म्हणाले की लिंपणगाव दलित वस्ती मधिल जुने आड(विहीर)गाळ काढुन पाण्यांचे हौद बांधण्यात यावे ,मातंग वस्ती मधे जुनी चावडी पाडुनं आर सी सी मधे बांधण्यात यावे, अंतर्गत क्राॅक्रेट रस्ते करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय ओहोळ यांनी विशेष ग्रामसभेत केली.
दरम्यान लिंपणगावचा विस्तार हा अत्यंत मोठा असून सहावाड्या आणि गाव असा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा कारभार पाहिला जातो. विशेष म्हणजे गाव परिसरात विविध जाती धर्माचे अनेक गोरगरीब कुटुंब वास्तव्यास असून, दिवसभर ही कुटुंबे काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. अचानक कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली तर या व्यक्तींना श्रीगोंदा या ठिकाणी प्राथमिक उपचार घेण्यासाठी जावे लागते. लिंपणगावमध्ये आरोग्य उपकेंद्र आहे, परंतु अपुरी कर्मचारी संख्या, औषधांचा तुटवडा, या बाबींना या गोरगरीब कुटुंबांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लिंपणगावला आरोग्य केंद्र उभारल्यास गोरगरीब जनतेला उपचार वेळेत मिळून मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक जाती-धर्माचे कुटुंबे हे जिथे रोजगार मिळेल तिथे काम करतात त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो. त्यामुळे दूरधर आजार होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यासाठी लिंपणगाव येथे आरोग्य केंद्र होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय ओहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, कोळगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंबळे इत्यादी मोठ्या लोकसंख्येच्या गावात आरोग्य केंद्र उभारण्यात आले, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत लिंपणगाव देखील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या गावात देखील आरोग्य उपकेंद्र आयोजित आरोग्य केंद्र कार्यान्वित व्हावे असे मत देखील श्री ओहोळ यांनी ग्रामसभेत मांडले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.