कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा १८ जागेसाठी ४८ उमेदवार रिंगणात.
By : Polticalface Team ,21-04-2023
श्रीगोंदा प्रतिनिधि :-
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा निवडणूक येत्या २८ एप्रिल रोजी पार पडणार असून एकूण १८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
गुरूवार दि. २० एप्रिल रोजी अर्ज माघार दिवशी १८ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वाधिक १९१ अर्ज आलेल्या सेवा संस्था मतदारसंघात ९ जागांसाठी २८ उमेदवार भिडणार आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात ६ जागांसाठी १२ उमेदवारांनी लढणार आहेत. व्यापारी- आडते मतदासंघांत २ जागेसाठी ५ उमेदवार लढणार असून मापाडी- हमाल मतदारसंघात १ जागेसाठी ३ उमेदवार लढणार आहेत.
आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नहाटा व अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी विकास पॅनलमध्ये सेवा संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी दिपक माणिकराव भोसले पाटील, भास्कर बापूराव वागस्कर, अजित अरविंद जामदार, पंडित भगवान गायकवाड, नितीन शिवाजी डुबल, अनिकेत रविंद्र शेळके, बाबासाहेब भाऊसाहेब जगताप तर महिला प्रतिनीधी म्हणून मनिषा योगेश मगर व अंजली संदीप रोडे यांनी अर्ज भरले आहेत.
इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात प्रविण लक्ष्मण लोखंडे, भटक्या विमुक्त जमाती मतदार संघात दत्तात्रय सोनबा गावडे, तर ग्रामपंचायत मतदारसंघात साजन सदाशिव पाचपुते, मितेश प्रवीणकुमार नहाटा, अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात शंकर सावळेराम पाडळे, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात देविदास गणपत शिर्के, हमाल मापाडी मतदारसंघात किसन रामभाऊ सिदनकर तर व्यापारी आडते मतदार संघात शिवाजी महादू शेळके हे उमेदवार पॅनलमध्ये आहेत.
आ. बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या नेतृत्त्वाखालील किसान क्रांती शेतकरी विकास पॅनलमध्ये सेवा संस्था मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, निवास श्रीधर नाईक, रोहिदास किसन पवार, प्रदीप किसन कोकाटे, संतोष एकनाथ ओव्हळ, सुभाष रामदास वाघमारे, रामदास भगवान झेंडे, महिला प्रतिनिधी म्हणून सविता बाबासाहेब बारगुजे व सविता भिमराव नलगे, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात वैभव पांडुरंग पाचपुते, तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघात ज्ञानदेव गणा खरात यांची उमेदवारी आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण जागांसाठी महेश दिलीप दरेकर, सुदाम नामदेव झराड, अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात प्रशांत दत्तात्रय ओगले, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात लक्ष्मण विठ्ठल नलगे, व्यापारी आडते मतदारसंघात लौकिक दिलिप मेहता व आदिक दत्तोबा वांगणे तर हमाल मापाडी मतदारसंघात भाऊसाहेब मारूती कोथींबीरे यांच्या उमेदवारी आहेत. २८ एप्रिल रोजी मतदान असल्याने कोण बाजी मारेल याची उत्सुकता आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी