दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात, यवत गावच्या बाजार मार्केटचा विकास थांबला, यवत गावातील नागरिकांचा सवाल
By : Polticalface Team ,23-04-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२२ एप्रिल २०२३, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात यवत येथील बैल गाय म्हैशीचा बाजार बंद पडला असल्याने गावचा विकास थांबला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे,
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत, शेतकरी विकास पॅनल चे नेतृत्व माजी आमदार रमेश आप्पा थोरात करीत आहेत, तर भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास पॅनलचे नेतृत्व विद्यमान आमदार अँड राहुल कुल, करीत आहेत, दौंड तालुका आजी माजी आमदारांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ व कमळ, हे न घेता किटली आणि कबशी हे चिन्ह घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती हि अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याचे बोलले जात आहे.
दौंड तालुका पंच्छिम भागातील मौजे यवत येथील बैल गाय म्हैस बाजार अनेक वर्षापासून बंद झाला आहे, मात्र दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व संचालक मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा होत आहे, यवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची १० एकर जमीन सभासद शेतकऱ्यांच्या मालकीची असताना देखील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन पदाधिकारी व संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व व्यापारी आडतदार मापाडी यांची सांगड घालून यवत या ठिकाणी भव्य मार्केट उभे करण्यात जाणिवपूर्वक टाळाटाळ करीत दुर्लक्ष केले असल्याने यवत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, पूर्वी यवत आठवडे बाजारामध्ये, गुळ बाजार मार्केट, भुईमूग शेंग बाजार मार्केट, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्रीसाठी, व्यापारी व आडतदार मोठ्या प्रमाणात येत असताना, तत्कालीन बाजार समितीच्या चुकीच्या कार्यकारी धोरणामुळे यवत मधिल मोठा गुळ बाजार व भुईमूग शेंग आठवडे बाजारात येणे बंद झाले, या मागचे राजकारण अध्याप समजून आले नाही कालांतराने यवत ग्रामपंचायत मालकीच्या जागेमध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीचा बैल गाय म्हैस खरेदी विक्री बाजार मोठ्या प्रमाणात असताना देखील बाजार समितीच्या हलगर्जी पणा मुळे व शेतकऱ्यांना योग्य सुविधा न पुरविल्याने बैल गाय म्हैशीचा बाजार हळूहळू कमी होऊन पूर्ण बंद झाला आहे, या आठवडे बाजारात लाखो रुपयांची उलाढाल पूर्ण बंद झाली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारी पदाधिकारी यांनी बंद पडलेला बैल गाय म्हैशीचा बाजार पुन्हा जोमाने सुरू करण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी उलट कृषी उत्पन्न बाजार समितीची यवत येथे १० एकर जमीन पडुन आहे, असा विचार करून तत्कालीन पदाधिकारी व संचालक मंडळाने, तालुक्यातील सभासद व शेतकऱ्यांची १० ऐकर जमीन दि,११ फेब्रुवारी २०१० साली,विक्रीसाठी निविदा काढून वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली होती, या विषयी दूरदृष्टीच्या सभासदांनी जागा विक्रीचा मनसुबा हाणून पाडला, त्यामुळे हि १० ऐकर जागा आज पर्यंत यवत येथे आबादीत आहे, मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याने या जागेत अनेक वर्षापासून अनाधिकृत अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्यामुळे दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येणाऱ्या नवनिर्वांचित संचालकांची डोकेदुखी अधिक वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हलगर्जी पणामुळे हातातुन निसटली असती, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती मालाची खरेदी विक्री बाजार मार्केट संकुलन होने अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही, त्यामुळे
यवत गावातील बाजार मार्केटच्या विकासाला गतीरोधक निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे, याला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,
यवत गावच्या विकासात भर घालणारी ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली असुन, या ठिकाणी अध्याप कोणत्याही प्रकारची व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात व भव्य मार्केट उभे करण्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम पणे कामगिरी करू शकली नाही, त्यामुळे यवत गावचा आठवडे बाजारची ओळख संपुष्टात आली असून मोठी बाजारपेठ हळूहळू विस्कळीत झाली आहे, याला नेमके जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दौंड तालुक्यात यवत येथे बैल गाय म्हैस जनावरांचा मोठा बाजार म्हणून जिल्ह्यात नावलौकिक होते, मात्र यवत गावचा बैल बाजार किंवा भाजी मार्केट बाजार वाढवण्यासाठी तालुक्यातील आजी माजी नेतेमंडळींनी प्रयत्न केले नाहीत, हि मोठी शोकांतिका असल्याचे समस्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे, यवत गावातील विकासाच्या मुद्द्यावर २० टक्के राजकारण तर ८० टक्के समाजकारण गाव कारभारी यांनी केले पाहिजे, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येणाऱ्या संचालक मंडळापुढे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे, दौंड तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी व्यापारी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक तसेच संस्था संचालक यांचे या विषयावर लक्ष वेधले आहे, पुढील काळात या बाबत दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रमुख अधिकारी व संचालक मंडळ यांना
मोठी कसरत करावी लागणार असुन, संबंधित अतिक्रमण धारकांचे
गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, यवत गावातील १० ऐकर मार्केट कमिटीच्या जागेत पूर्वीप्रमाणे बैल गाय म्हैस जनावरांचा बाजार, गुळ बाजार, भुईमूग शेंग बाजार, कांदा मार्केट भाजी मार्केट बाजार सुरू झाला तर पंचक्रोशीतील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, शेतकरी, व्यापारी, आडतदार मापाडी यांची सततची वर्दळ यवत गावच्या फायद्याची ठरली जाईल, त्यामुळे यवत गावच्या विकासात भर पडल्या शिवाय राहणार नाही, गेली अनेक वर्षापासून बैल गाय म्हैस खरेदी विक्री बाजार बंद पडला आहे, त्यामुळे दौंड तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी काष्टी बाजारात धाव घेत आहेत, तसेच पंचक्रोशीतील फुल
शेतकरी व तरकारी भाजी मार्केट साठी पुणे मार्केट यार्ड, हडपसर भाजी मंडई येथे जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत, यवत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती मालाची खरेदी विक्रीसाठी सर्वांगीण मार्केट उभारल्यास अधिक सोयीचे होईल, याची दक्षता भावी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
यवत गावच्या विकासाला चालना मिळेल अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात तालुक्यातील आजी माजी आमदार या संदर्भात विचार करतील का ? असा प्रश्न निर्माण झाला असुन
पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे,पुणे सोलापूर महामार्गावरील मोठ्या प्रमाणात असलेल्या लोक वस्तीचे गाव असुन शेतकरी व्यापारी यांच्या सर्व प्रकारच्या सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध होतील का ? अशी व्यवस्था निर्माण होऊ शकते का ? दौंड तालुक्यातील आजी माजी आमदार साहेबांनी राजकारणात मोठ्या पदापर्यंत अनेकांना संधी उपलब्ध करून दिली आहे, मात्र यवत येथील शैक्षणिक परिस्थिती आणि बाजार मार्केट, व्यापार संकुलन बाजारपेठ म्हणावी तशी उभी राहु शकली नाही.
केडगाव चौफुला वरवंड पाटस या भागातील बाजारपेठेचा विचार केला तर यवत गावची विकासापासून मोठी नुकसान झाली असल्याचे दिसून येते.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व व्यापारी आडतदार यांच्या हिताचे निर्णय घेऊन अनेक वर्षापासून प्रलंबित व पडीक असलेल्या यवत बाजार मार्केटच्या जागेत पूर्वीप्रमाणे बैल गाय म्हैस खरेदी विक्री बाजार, तसेच गुळ बाजार, भुईमूग शेंगा बाजार, कांदा मार्केट, भाजी मार्केट, सुरू झाल्यास यवत गावच्या विकासात भर पडल्या शिवाय राहणार नाही, यवत गावातील कारभारी यांनी मताचे राजकारण कमी करुन यवतच्या विकासाचे राजकारण अधिक करावे अशी समस्त ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.