पेडगाव किल्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार - आमदार अमोलदादा मिटकरी
By : Polticalface Team ,23-04-2023
दि.२२ रोजी महाराष्ट्र विधानपरषदेचे विद्यमान आमदार अमोल मिटकरी साहेब यांनी धर्मवीरगड ( बहादूरगड) पेडगाव तेथे भेट दिली. किल्याच्या प्रवेशद्वारापाशी चपटनाथ मारुतीच्या मूर्तीचे कुतूहलपूर्वक माहिती घेतली.तसेच किल्यातील भैरवनाथ,मल्लिकार्जुन,रामेश्वर, लक्ष्मीनारायण व बालेश्र्वर या मंदिराचा इतिहास जाणून घेतला.भोसले कुळातील बाबाजीराजे,मालोजीराजे, विठोजीराजे व शहाजीराजे यांचा स्नेह या परिसराशी राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अनंत यातनांचा साक्षीदार हा गड राहिलेला आहे. किल्ला व परिसरातील इतिहास डॉ. राजेश बाराते यांनी अवगत करून दिला.किल्यातील संवर्धन कार्याची माहिती डॉ.निलेश खेडकर व मच्छिंद्र पंडित यांनी करून दिली.
अमोल मिटकरी साहेबांनी किल्यातील सर्व समस्या समजून घेतल्या. तात्काळ आमदार निधीतून स्मारक परिसरात दगडी पिचींगसाठी ५ लाख रुपये मंजूर केले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. पेडगाव किल्ल्यातील गडपालांचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करून मार्गी लावला जाईल. या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांवर शासकीय गडपालांची नेमणूक करावी यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार आहे असे आश्वासन दिले.किल्याच्या विकासात निधीची कमतरता होणार नाही याची शासन स्तरावर काळजी घेऊ. या गडाचा इतिहास खूप ज्वलंत आहे. येथे आल्याने शंभूराजांचा आशीर्वाद व प्रेरणा मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी येथे नक्की यावे हे आवाहन त्यांनी केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिदास आबा शिर्के,स्वप्नील थोरात,अपुल राठोड,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे,मच्छिंद्र पंडित,डॉ.निलेश खेडकर, दादासाहेब जंगले,डॉ.राजेश बाराते,भाऊ घोडके,नंदकुमार क्षीरसागर व धर्मवीरगड सेवा समितीचे सेवक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी