श्रीगोंदा तालुक्यात रमजान ईद व अक्षया तृतीया सण उत्साहात साजरा, सर्व धर्मीयांकडून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

By : Polticalface Team ,23-04-2023

श्रीगोंदा तालुक्यात रमजान ईद व अक्षया तृतीया सण उत्साहात साजरा, सर्व धर्मीयांकडून मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छांचा वर्षाव
    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र 22 एप्रिल रोजी रमजान ईद बरोबरच अक्षया तृतीया सण उत्साहात साजरा करण्यात आले. दरम्यान अक्षया तृतीया आणि रमजान ईद हे सण गेल्या अनेक वर्षानंतर एकाच दिवशी आल्याने सर्वधर्मी यांनी या दोन्हीही सणाचे जल्लोषात स्वागत केले. वास्तविक पाहता श्रीगोंदा तालुका हा संतांच्या पावनभूमीत असणारा पवित्र तालुका म्हणून राज्यात परिचित असा संबोधला जातो. या तालुक्यामध्ये मुस्लिम बांधवांनी इतर समाज बांधव यांचे अत्यंत ऋणानुबंधाचे नाते आहे. ते नाते या सणाच्या माध्यमातून अधिक दृढ होताीना दिसत आहे अगदी इतर धर्मियांवर कोणताही सुखदुःखाचा प्रसंग असो, या प्रसंगांमध्ये एकमेकांच्या सुख दुःखात सर्वजण सहभागी होत असतात. ही शिकवण संत श्रेष्ठ शेख महंमद महाराजांनी पूर्वजांना दिली. ती आजही कायम दिसून येते. श्रीगोंदा तालुक्यामध्ये विशेषता श्रीगोंदा, काष्टी, पेडगाव, लोणी व्यंकनाथ, चिंभळा, लिंपणगाव या गावांमध्ये मुस्लिमांची मोठी संख्या आहे. अगदी सर्व समाजाशी एकरूप राहून मुस्लिम समाजाने सर्वांशीच सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आतापर्यंत उत्कृष्टपणे जोपासले. त्यामुळे बंधुत्व सर्वधर्मसमभावाचे तत्व सर्वांकडूनच जोपासले जाते. ही अभिमानाची बाब समजली जाते. त्यातून एकमेकांविषयी निश्चितच आदराची भावना निर्माण होते. एवढेच नव्हे तर कोणत्याही समाजावर अतिप्रसंग ओढावला तर मुस्लिम समाज बांधवांची भूमिका ही निश्चितच प्रेरणादायी ठरते. त्यामुळे आतापर्यंत श्रीगोंदा तालुक्यात या समाजाने सर्वांनाच एकात्मतेची व बंधुत्वाची भूमिका पार पाडत आपले अस्तित्व कायम ठेवले. त्यामुळे रमजान ईद सारख्या सणाला मुस्लिम बांधव सर्वांनाच आदराने आमंत्रित करून आपुलकीची भावना त्यातून तयार होते. त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संबंधातून निर्माण होतो. दरम्यान 22 एप्रिल रोजी रमजान ईद व अक्षया तृतीया या सणाच्या निमित्ताने सोशल मीडियावर देखील सर्व धर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा देतानाचा संदेश अत्यंत प्रेरणादायी ठरला. या गोड संदेशामुळे निश्चितच श्रीगोंदा तालुक्याचे दैवत संत श्रेष्ठ शेख महंमद महाराजांनी दिलेली शिकवण व संदेश आजही सर्व धर्मीयांमध्ये बिंबवत आहे. हे या सणांवरून दिसून येत आहे. त्यामध्ये आज अक्षया तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी अनेकांनी या शुभ मुहूर्तावर आपला वर्षपूर्तीचा संकल्प ठेवत आनंद घेतला. अक्षया तृतीया निमित्त गावोगावी अनेकांनी स्वप्नपूर्ती करण्यासाठी बंगला, घर, दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करत इमारतींचा पाया खोदला. तर सोने देखील खरेदी करण्याबरोबरच विविध व्यवसायाची दुकानांचे देखील या शुभमुहूर्तावर उद्घाटने करण्यात आली. त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. एकूणच चालू वर्षी रमजान ईद व अक्षया तृतीया हे सण एकाच दिवशी आल्याने दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल त्यामुळे या दोन्ही सणांचे जल्लोषात स्वागत करत मुस्लिम बांधव व हिंदू धर्मियांनी एकमेकांना यानिमित्ताने शुभ संदेश देण्याचा आनंद देखील घेतला. दरम्यान अक्षय तृतीया निमित्त अनेक गावांमध्ये वयोवृद्ध ग्रामस्थांसह महिला वर्गांनी देखील आपापल्या गावांमध्ये ग्रामदैवतेला साकडे घालत सर्वांना सुखात आनंदात व ऐश्वर्या ठेवा, अशा प्रार्थना करत इथून पुढे सर्वांचं आरोग्य अबाधित राहून जगातील कोरोना सारखी परिस्थिती येथून पुढे कोणत्याही देशावर उद्भवू नये. असे साकडे घालत सर्वांनीच प्रार्थना केल्याचे दिसून आले. एकूणच रमजान ईद आणि अक्षया तृतीया हा सण श्रीगोंदा तालुक्यात उत्साही वातावरणात संपन्न झाला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष