मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल ला स्पष्ट बहुमत
संस्था पुन्हा आमदार पाचपुते गटाकडे
By : Polticalface Team ,25-04-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंढेकरवाडी सेवा संस्थेच्या १२ जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने ही संस्था पुन्हा आमदार पाचपुते गटाकडे कायम राहिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या संस्थेची निवडणूक अत्यंत अटीतटीची पार पडली. या निवडणुकीत नागवडे गटाला सहा तर आमदार पाचपुते गटाला सहा असे समसमान उमेदवार निवडून आल्याने, या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे नूतन पदाधिकारी नेमण्यासाठी मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी मात्र नागवडे गटाने आमदार पाचपुते गटाची सत्ता रोखून धरली होती. श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी पाचपुते- नागवडे गटाला जवळपास सहा महिने संधी दिली होती. परंतु तरी देखील त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होऊ शकली नाही. अखेर श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांनी सहकार कायद्यानुसार संस्थेचे आर्थिक कारभार पाहण्यासाठी प्रशासक म्हणून जिल्हा बँकेचे शाखा अधिकारी बाळासाहेब उंडे यांची या संस्थेवर प्रशासक म्हणून नेमणूक केली. विशेष म्हणजे प्रशासकांनी देखील एक वर्षभर कारभार पाहताना संस्थेचे हित जोपासत मागील आर्थिक वर्षाची 100% कर्ज वसुली करून संस्थेचे अस्तित्व व पत कायम ठेवली अशाप्रकारे या संस्थेमध्ये जवळपास एक वर्षभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर मात्र सहकार कायद्यानुसार श्रीगोंद्याच्या सहाय्यक निबंधकांना संस्थेची निवडणूक घेणे बंधनकारक ठरले. त्यामुळे सहाय्यक निबंधकांनी या संस्थेची पुन्हा 23 एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. यावेळी आमदार पाचपुते नागवडे गट आमने-सामने निवडणुकीला उभे होते या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार पाचपुते गटाचे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला 11 तर श्री भैरवनाथ किसान क्रांती पॅनल नागवडे गटाचे एकमेव उमेदवार आप्पासाहेब महादेव कुरुमकर हे निवडून आले आहेत.
श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले उमेदवार व त्यांनुा मिळालेली मते पुढील प्रमाणे:- सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून मुंढेकर नारायण शिवराम ५५१, शेंडे गोरख भानुदास ५०३, जाधव अमोल रामदास ४८४, चव्हाण संतोष धनाजी ४७६, हराळ भाऊसाहेब आप्पा ४७२, कुरुमकर चमक सर्जेराव ४४७, कुरुमकर बाळासाहेब हौसराव ४४७, (आमदार पाचपुते गट), तर नागवडे गटाचे कुरुमकर आप्पासाहेब महादेव 4७१, महिला राखीव प्रतिनिधी खोडवे प्रमिला मनोज ५०७, बाबर आशा बापू ४७४, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून रंधवे संदीप विलास ५३२, तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागासवर्ग प्रवर्गामधून गवते धनंजय माणिक ५२२ आदी उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेंद्र घोडके यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून तानाजी देशमुख यांनी सहकार्य केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.