लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर कै.सुभाष किसन साळवे वय ६३ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात, पत्नी, दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
पुणे येथे १८वर्ष,तर उक्कडगाव येथे १५वर्ष भारतीय डाक सेवेत पोस्टमास्तर म्हणून त्यांनी सेवा केली.आदर्श शिक्षक मारूती साळवे, इंजिनिअर गणेश साळवे यांचे ते वडील तर काष्टी येथील पत्रकार संतोष दत्तू शिंदे यांचे मामा होते.
त्यांनी उक्कडगाव येथे अतिशय कष्टातुन माळरानावर शेती फुलवली.गावातील सामाजिक क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते.प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी मोठा जनसंपर्क जोडला.त्यांच्या अचानक जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्यविधीवेळी बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार व उक्कडगाव व परीसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :