आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा येत्या 27 एप्रिल पासून उर्स प्रारंभ लाभ घेण्याचे केले उर्स पंच कमिटीने आवाहन

By : Polticalface Team ,26-04-2023

आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा येत्या 27 एप्रिल पासून उर्स प्रारंभ लाभ घेण्याचे केले उर्स पंच कमिटीने आवाहन करमाळा प्रतिनिधी आवाटी तालुका करमाळा येथील हिंदू मुस्लिम भक्तगणांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांच्या उरसास येत्या 27 एप्रिल 2023 गुरुवारपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती उर्स पंच कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ यांनी बोलताना माहिती दिली आवाटी येथील सुफी संत हजरत वली चांद पाशा कादरी यांच्या आशीर्वादाने आवाटी येथील ग्रामदैवत हजरत आबिद अली शाह कादरी यांचा येत्या 27 एप्रिल गुरुवार रोजी संदल शरीफ चा धार्मिक कार्यक्रम असून याच दिवशी रात्री दर्गाह पटांगणावर कव्वालीचा दुहेरी मुकाबला रंगणार असून यामध्ये राजस्थान येथील सुप्रसिद्ध कव्वाली गायक सरफराज साबरी तसेच भोपाळ येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका इंतजार चिस्ती यांच्यामध्ये कव्वालीचा दुहेरी मुकाबला होणार आहे सदर कव्वालीच्या कार्यक्रमाचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे तसेच दिनांक 28 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी हजरत आबिद अली शाह यांच्या जुलूस मिरवणुकीचा कार्यक्रम निघणार असून संपूर्ण गावातून सदर जुलुसाचा मार्गक्रम होणार आहे यामध्ये बाबाचा मानाचा घोडा असणार आहे पहाटे फजर ला दर्गा येथे जुलूस पोहचणार असून या ठिकाणी बाबांच्या मदारीवर चादर चढविण्याचा धार्मिक कार्यक्रम होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत बँड वाद्यपदक सहभागी होणार असून यामध्ये करमाळा येथील संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले रज्जाक ब्रास बँड, तसेच पाटोदा येथील जनता ब्रास बँड, बारामती येथील अमर ब्रास बँड, इट येथील झंकार ब्रास बँड, हे बँड वाद्यपदक आपली कला सादर करणार आहे याशिवाय दिनांक 27 एप्रिल गुरुवार संदल निमित्त आलेश्वर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील राज्यभरात प्रसिद्ध असलेले स्वर संगम ब्रास बँड हे बँड पथक आपली कला सादर करणार आहे याशिवाय दर्गाह परिसरात वेगवेगळ्या रंगाची विद्यु त आकर्षक रोषणाई विजापूर येथील सादिक भाई यांनी केली आहे सदर उर्स व संदल या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भक्तगणांनी शांतता पद्धतीने घ्यावा असे आवाहन उर्स पंच कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ आवाटी यांनी केले आहे
हिंदू मुस्लिम ऐक्याचा आजही राखला जातो एकोपा आवाटी येथील हजरत आबिद अली शाह कादरी यांच्या उरूसा निमित्त आजही मुस्लिम भक्त गणा बरोबर हजारो हिंदू भक्तगण या दर्गावर आपली मुरादे पूर्ण करण्यासाठी येतात व मदार शरीफ वर चादर चढवितात राष्ट्रीय एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन या ठिकाणी घडते याचाच अर्थ आजही या दर्गाहावर हिंदू मुस्लिम एकोपा टिकून आहे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी