भिमा पाटस साखर कारखाना ५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी, खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यात तोफ कडाडली

By : Polticalface Team ,27-04-2023

भिमा पाटस साखर कारखाना ५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी, खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यात तोफ कडाडली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २६ एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील भिमा पाटस सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे हा कारखाना कोण्या ऐकाच्या मालकीचा नाही, या तालुक्यातील ४९ हजार सभासदांच्या मालकीचा भिमा पाटस साखर कारखाना आहे, सहकारी कारखाना टिकला पाहिजे यासाठी चाललेली धडपड, गेली दोन वर्षीपासून कारखान्याचे विद्यमान चेअरमन घास घ्यायला टपलाय आणि त्याला रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने, राज्यव्यापी लढ्याला जर कोणी स्थान दिले असेल तर ते खासदार संजय राऊत यांनी दिले असल्याचे सांगत ७० हजार साखरेचे पोती जळतात का? असा सवाल करत, मी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करा, मी तुमच्या घरी धुनी भांडी करेल असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी वरवंड येथील सभेत बोलताना सांगितले, या प्रसंगी ,सौ सायली ताई दळवी, वैशालीताई नागवडे, दौंड तालुका माजी आमदार रमेश आप्पा थोरात, कसबा मतदार संघातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या मनी,,, भ्रष्टाचार प्रकरणी आपले मनोगत व्यक्त केले, भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटीचा भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी महाविकास आघाडीतील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन, मनी,,,भ्रष्टाचार प्रकरणी राज्यातील सीबीआय तसेच ऐडी विभागाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका घेऊन वरवंड येथे दि २६ एप्रिल २०२३ रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २८ रोजी होणार असल्याने दौंड तालुक्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी समोरा समोर लढत आहे, घोडे मैदान लांब नाही, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागुन राहीले आहे, भिमा पाटस सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधकांना पॅनल सोडा साधे उमेदवार सुध्दा मिळाले नाहीत अशी सभेला आलेल्या नागरीकांमध्ये चर्चा सुरू होती, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव बापू ताकवणे यांच्या हाकेला धावून आलेले, उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत, यांची वरवंड येथील सभेत तोफ कडाडली, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी ३६ कोटी रुपयाचे पॅकेज देऊन सुद्धा कारखाना सुरू झाला नाही, असा प्रश्न उपस्थित करत, कोण कुठला कर्नाटकचा इराणी याला कारखाना चालवायला दिला, महाराष्ट्रातील कोणी भेटला नाही का ? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी सभेत बोलताना सांगितले, तसेच भीमा पाटस सहकारी साखर, मधुकर शितोळे यांनी उभा केला, त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी बंदी घातली, हा सत्तेचा दुरुपयोग नाही का,? १४४ कलम लागू कले, या मागचे नेमके कारण तरी काय, शेतकरी व सभासदांनी या सभेला येऊ नये, तसेच भिमा पाटस च्या ४९ हजार सभासदांनी ५०० कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अँड राहुल कुल यांच्या विरुद्ध सभासदांनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आव्हान खासदार संजय राऊत यांनी केले आहे, या प्रसंगी दौंड तालुका महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेनेचे दौंड तालुक्यातील पदाधिकारी अनिल सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष