एम.जे.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आळींबी आणि गांडुळ खत प्रकल्पास भेट.
By : Polticalface Team ,27-04-2023
श्रीगोंदा/ प्रतिनिधी दि. २६/४/२०२३
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाणे अभ्यासक्रमात महाविद्यालयानी शैक्षणिक सहल आयोजित करावेत असे नमूद केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात न फिरता स्वतः उद्योग व्यवसाय करून नवीन रोजगार निर्माण करावे यासाठी महाविद्यालयातील वनस्पतीशास्र व प्राणिशास्र विभागाच्या वतीने प्रथम वर्ष विज्ञान या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेट बुधवार दि. २६ एप्रिल २०२३ रोजी "आळींबी लागवड (Mushroom Cultivation) आणी प्रशिक्षण केंद्र लखे फार्म मुंढेकरवाडी, श्रीगोंदा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.या शैक्षणिक भेटीसाठी वनस्पती विभागप्रमुख डॉ.हरिभाऊ वाघीरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेटीचे आयोजन केले व त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जरे सर, सायन्स विभाग प्रमुख प्रा. अहिवळे सर आणि प्रा. देवकर बापू यांचे ही सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या सहलीसाठी महाविद्यालयातील ४० विद्यार्थानी सहभाग घेतला होता.
यावेळी लखे फार्म चे मालक श्री तात्या लखे यांनी आळींबी बद्दल विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आळींबी ही एक बुरशी (fungi) असून त्याचा प्रोटीन म्हणून वापर करता येईल आणि त्यापासून आर्थिक दृष्ट्या ही मदत होईल.या आळींबी पासून बिस्कीट, पापड आणी पावडर इ.तयार करून त्याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच कर्करोगावर्, डायबिटीस वरती केला जातो .श्री.तात्या लखे यांनी आळींबी ची लागवड कशी करावी, तिचे बीज कसे तयार करावे, तसेच बाकी बुरशी विरहित कसे ठेवावे याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आळींबी चे चांगले उत्पादन घेण्यासाठी लागणारे तापमान, आद्रता, आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले.तसेच आळींबी कशी वाढवावी, त्यासाठी लागणारे बेड कसे भरावे आणि त्यांचे निर्जंतुकीकरण कसे करावे याचे प्रातयाक्षिक करून विद्यार्थाना दाखवले.श्री लखे यांना या क्षेत्रातील २२ वर्षाचा अनुभव आहे. आणी ते विद्यार्थ्यांना,संशोधकांना व शेतकऱ्यांना आळींबी बद्दल प्रशिक्षण देतात.त्यांनी आळींबी पासून बनवलेले विविध पदार्थ भारतभर वितरीत केल्या जातात. प्रश्नउत्तरामधे विद्यार्थ्यानी लागवड पॅकिंग व विक्री यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्याचे समाधानकारक उत्तर श्री लखे यांनी दिले.तसेच गांडूळ खत त्याचा ऊपयोग याबद्दल माहिती दिली. सहलीसाठी प्रा. डॉ. ताटे मॅडम, प्रा.डॉ.संदीप इंगळे,प्रा.गोपाळ मगर, प्रा. महांकळे मॅडम उपस्थित होते.शेवटी महाविद्यालयाचा वतीने डॉ.हरिभाऊ वाघीरे यांनी सर्वांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.