डिजिटल कचरा बाजूला करून करिअर करता मोबाईल चा उपयोग करावा : यशवंत शितोळे
By : Polticalface Team ,28-04-2023
विद्यार्थी दिवसातील ८ ते १० तास सर्वात जास्त वेळ मोबाईलच्या संगतीमध्ये असतात आणि संगत कोणासोबत जास्त आहे, त्यावर त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित होत असते.त्यामुळे मोबाईल मधील विविध अप्लिकेशन चा उपयोग करिअर घडवण्यासाठी करावा. त्यानंतर ५ ते ६ तास शिक्षकांच्या आणि १ ते २ तास मित्र-मैत्रिणी आणि फक्त १ तास आई -वडीलांच्या ऑफलाईन संपर्कात असतात.जे विद्यार्थी १ तासापेक्षा जास्त वेळ आई-वडिलांशी संवाद साधत असतील ते नशीबवान आहेत असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात गुरुवार दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत करिअर कट्टा उपक्रमाचे विस्तारित स्वरूप समजून घेण्यासाठी विद्यार्थी संवाद आणि मार्गदर्शन वर व्याख्यान आयोजित केले होते.जवळपास २५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.त्यांच्यासोबत पुणे विभागीय प्राचार्य प्रवर्तक म्हणून प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील सर आणि उत्तर जिल्हा समन्वयक प्रा.नवनाथ नागरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी होते.
छत्रपती कॉलेजमध्ये करिअर कट्टा मार्फत मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातील फक्त १०० कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलंस करता मान्यता दिली आहे त्यात छत्रपती कॉलेजचा समावेश आहे.याकरता शासनाकडून टप्या टप्याने १० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचणे शक्य नसेल त्यांनी कुक्कु ऍप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे, की जे तुम्ही प्रवासात असले तरी ऑडिओ द्वारे पुस्तके वाचून आपल्याला ऐकवते.
करिअर कट्टातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा नावाचे ऍप इन्स्टॉल करावे. यातून आयए.एस. आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला यातून भारतातील नामांकित अधिकारी परीक्षेची तयारी कशी करावी आणि उद्योजक हे त्यांनी उद्योग कसा उभारला याचे मार्गदर्शन करतात.असे अभिनव उपक्रम फक्त ३६५ रुपयात तीन वर्षे केले जाते. वर्षभराचे व्यस्त नियोजन या करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर पर्यत नेऊन ठेवते असेही त्यांनी नमूद केले.
लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं तरुणांबद्दल बोललं जातं पण छत्रपती कॉलेजचा तरुण जिथं पाणी असेल तिथंच लाथ मारतो असे छोटेखानी विनोद साधत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा समारोप केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कॅम्पस मुलाखतीमधून कॉलेजने बँकिंग आणि कंपनी मध्ये १०० पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध केले आणि या वर्षी २९ विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कॉलेज समन्वयक प्रा.विलास सुद्रिक यांनी केले तर आभार प्रा.विजय इथापे यांनी मानले.
या प्रसंगी वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.एन. एस. साबळे, नॅक समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर कर्पे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ.मन्मथ लोहगावकर, शिंदे मॅडम, शेळके सर, व इतर प्राध्यापक व प्राध्यापिका आणि २५० विद्यार्थी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :