गणपती मळ्यात जि.प.प्राथमिक शाळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे...
By : Polticalface Team ,28-04-2023
श्रीगोंदा- प्रतिनिधी
सविस्तरअसे की गुरुवार दिनांक २७/४/२०२३ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेहेत्रेवस्ती (गणपती मळा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सरू झाला. तो रात्री १० वाजेर्यंत उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी गणपती मळा पंचक्रोशीतील सर्व नगरसेवक, पत्रकार, विद्यार्थी,पालक सर्व शिक्षक वृंद, सर्व तरुण मंडळाचे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष -सदस्य उपस्थित होते. कोविड नंतर शाळेत पहिल्यांदाच स्नेहसंमेलन होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्ग उत्साही होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीसह सर्व शिक्षक रुंदांनी मेहनत घेतली. लहान विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आवडल्यामुळे पालकांनी ग्रामस्थांनी आर्थिक सोरुपात मदत करून शाबासकी दिली. जमा झालेली बक्षीस रक्कम शाळेतील अपुऱ्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल असे शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती वाळुंज मॅडम यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :