करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील

By : Polticalface Team ,30-04-2023

करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार,,,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेटी देणार, नुकसानभरपाई लवकर मिळाली पाहिजे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने चांगलेच थैमान घातल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. आता माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र तातडीने या नैसर्गिक संकटात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या गावांना भेट देण्याचे ठरविले आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की अवकाळी पावसाने चिखलठाण, कुगाव, शेटफळ, अंजनडोह, दहिगाव, खडकेवाडी, देवळाली, जेऊर, सरफडोह, जेऊरवाडी, पोफळज, सोगाव, केडगाव, झरे, मांजरगाव, पोंधवडी, वाशिंबे, मलवडी, घोटी, पोथरे, खांबेवाडी, निलज, अर्जूनगर, पांडे, सौंदे, करंजे, पाथुर्डी, साडे, उमरड, दिलमेश्वर, गुळसडी व वरकटणे आदि 31 गावातील अवकाळी पावसाची व वादळ वारे याची नोंद करमाळा महसुलकडे असून आणखी अनेक गावांना या अवकाळी पावसाचा व वादळाचा फटका बसल्याची शक्यता आहे. करमाळा तालुक्यातील केळी, डाळींब, द्राक्षे, आंबा या नगदी फळबागांसह अनेक पिकांवर या अवकाळी पावसाचा व वादळाचा परिणाम झाला आहे. लाखो रुपये गूंतवून व पिक लागणीपासून खर्च व कष्ट करुन वाढवलेली पिके निसर्गाच्या एका संकटात जमिनदोस्त झाली आहेत. करमाळा तालूका हा केळीचा पट्टा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परदेशातही येथील केळीला मागणी असून जादा प्रमाणात केळीची लागवड या तालूक्यात होती. यामुळे झालेले नूकसान हे शेकडो कोटी रुपयांच्या पुढे असणार आहे. तातडीने नुकसान झालेल्या भागातील पिकांचे पंचनामे तयार केले जावेत व सदरचा माहिती अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा अशी विनंती आपण तहसिलदार यांना केली असून महसुल विभागानेही प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.आपण स्वतः या नुकसान झालेल्या भागास भेट देणार असून शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगात धीर देऊन शक्य तेवढी शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावणार आहोत. फळवागा व पिकांच्या नुकसानी बरोबरच, पशुखाद्य, पशुधन यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी व नागरिक यांच्या राहत्या घरांची पडझड झालेली आहे. पाॅली हाऊस सारख्या मोठी गुंतवणूक केलेल्या प्रकल्पांना या अवकाळी पावसाने तडाखा दिला असून प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व बाबींची लेखी नोंद प्रशासनाने म्हणजेच महसुल व कृषी विभागाने एकत्रीतपणे नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन घ्यावी ही पहिली मागणी आपण केली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या नुकसानीबद्दल माहिती देऊन भरपाई मिळावी म्हणून आग्रह धरणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी