श्रीगोंदा बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांचा गड आला पण सिंह गेला

By : Polticalface Team ,30-04-2023

श्रीगोंदा बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांचा गड आला पण सिंह गेला श्रीगोंदा :- श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना संपविण्यासाठी निघालेले पाचपुते नागवडे एकत्रित येऊन निवडणूक केली मात्र या निवडणुकीत पाचपुते नागवडे यांना चारी मुंड्या चीत करत राहुल जगताप यांनी पाचपुते नागवडे यांच्या भारतीय बाजार समितीच्या राजकीय वर्चस्वाला सुरू लावून बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला मात्र गड आला पण सिंह गेला. श्रीगोंदा तालुक्यातील खरेदी विक्री संघाची दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप व राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी डावपेच टाकत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता म्हणून जगताप यांना संपविण्यासाठी श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार बबनराव पाचपुते व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एकत्रित पॅनल केला होता. तर राहुल जगताप व बाळासाहेब नाहटा यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला होता. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होऊन दोन्हीही पॅनल च्या नेत्यांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन करण्यात आले होते. आज झालेल्या श्रीगोंदा बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने पाचपुते नागवडे यांच्या पॅनलच्या चारी मुंड्या चीत करत ११ जागा जिंकून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तर पाचपुते नागवडे यांच्या गटाला अवघ्या ७ जागा मिळवून समाधान मानावे लागले. सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघात बापूसाहेब जगताप , अजित जामदार , नितीन डुबल , दीपक पाटील भोसले ,भास्कर वागस्कर , इतर मागास प्रवर्गात प्रविण उर्फ अतुल लोखंडे, भटक्या विमुक्तमध्ये दत्तात्रय गावडे, महिला प्रवर्ग मनीषा मगर, अंजली रोडे , तर ग्रामपंचायत मतदारसंघात साजन पाचपुते , हमाल मापडी मतदार संघात किसन सिदनकर हे जगताप गटाचे विजयी उमेदवार तर पाचपुते - नागवडे सर्वसाधारण सोसायटी मतदारसंघात दत्तात्रय पानसरे, रामदास झेंडे, तर ग्रामपंचायत मतदारसंघात महेश दरेकर, ग्रामपंचायत दुर्बल घटक मतदारसंघात लक्ष्मण नलगे, ग्रामपंचायत अनुसूचित मतदारसंघात प्रशांत ओगले आणि व्यापारी मतदारसंघात लौकिक मेहता, आदिक वांगणे आदी उमेदवार विजयी झाले.
जगताप यांच्या गटाचा गड आला पण सिंह गेला.?
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनलचा गड आला पण सिंह गेला. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत राहुल जगताप यांना मदत करणारे बाळासाहेब नाहटा यांचे चिरंजीव मितेश नाहटा यांना पराभव पत्करावा लागला.


सभापती पदामुळे केला पराभव?
बाजार समितीच्या निवडणुकीत राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचे चिरंजीव निवडुन आल्यास जगताप गटाकडून सभापती पदावर विराजमान होतील म्हणूनच विरोधी पक्षासह पक्षांतर्गत काही कार्यकर्त्यांनी नाहटा यांना टार्गेट करून मितेश नाहटा यांचा पराभव केला.


माजी आमदार राहुल जगताप यांना संपविण्यासाठी पाचपुते नागवडे यांनी एकत्र येऊन जगताप यांना लढा दिला मात्र. जगताप यांनी आपली स्टॅटर्जी राबवून पाचपुते नागवडे यांचा डाव कोलमडून बाजार समितीवर वर्चस्व मिळवले. पाचपुते नागवडे एकत्र आल्यामुळे सर्व मतदार जगताप यांच्या बाजूने आल्याने विजयाचा रथ कोणी रोखू शकत नाही. आत्ता राहुलपर्व सुरू झाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी सांगितले


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.