कालकथित भास्कराव बाबुराव थोरात यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त, प्रतिष्ठानच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार, कार्यक्रम संपन्न
By : Polticalface Team ,01-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,३० एप्रिल २०२३ दौंड तालुक्यातील मौजे नानविज फाटा येथील थोरात कुटुंबाची वाटचाल ही शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील जानते व्यक्तिमत्व असलेले कालकथीत भास्करराव बाबुराव थोरात यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त दौंड तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींना, भास्करराव बाबुराव थोरात प्रतिष्ठानच्या वतीने जेष्ठ पत्रकार एम जी शेलार तसेच दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,दि २८ एप्रिल रोजी थोरात यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
कालकथित भास्करराव बाबुराव थोरात यांच्या शिकवणी प्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांनी आदर्श घेऊन,
फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा चालू ठेवला आहे, ही बाब अतिशय प्रेरणादायी व सुसंस्कृत असुन, स्तुत्य व परिवर्तनशील असल्याचे भन्ते धम्मानंद यांनी प्रबोधनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त करत, तथागत गौतम बौद्धांनी दिलेला संदेश, अप्त दिप भव, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, पंचशिल चार आर्य सत्य, तथागतांनी दिलेल्या अष्टांगिक मार्गाचे अनुकरण केल्यास जरा मरण दुःखातुन मुक्तता मिळू शकते, बौध्द धम्माची शिकवण उपस्थित समाज बांधवांच्या हितार्थ रूढी परंपरा विरहित विज्ञानवादी विचार आणि भय मुक्त होण्याचा संदेश भन्ते धम्मानंद यांनी व्यक्त केले,
तसेच परभणी येथील व्याख्याते नितीन सावंत यांनी राष्टीय महापुरुषांची शौर्यगाथेची शिकवण या विषयी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष व्याख्यानातून मांडण्याचा प्रयत्न केला,
सुरुवातीस तथागत गौतम बौद्ध मूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धवृत्ती पुतळ्याचे थोरात कुटुंबीयांच्या हस्ते पुजन करण्यात आले, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रीकृष्ण मोरे यांनी त्रिसरण पंचशील धम्म वंदना घेण्यात आली, या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश थोरात, उपाध्यक्ष मिलिंद थोरात, सचिव नितीन थोरात यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार, व दौंड पोलीस स्टेशन येथे रुजू असलेले गायकवाड, यांना स्मृतिचिन्ह, शाल आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले, या वेळी गिरीमचे माजी सरपंच नन्दु खताळ, किसन मदने यांचा ही सत्कार करण्यात आला, या प्रसंगी प्रमुख उपस्थिती, महेंद्र गायकवाड, भगवान इगवे, सचिन कांबळे, अनिल गायकवाड, विकास आढाव, प्रकाश कसबे, केशव कुदळे, झुंबर शिंगटे, विलास गोरे, वल्ली पठाण, नन्दु गायकवाड, अर्जुन फुलारी, प्रकाश जाधव, या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती, तसेच बोरिबेल आणि राहू येथील पै पाहुणे आणि सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे
प्रास्तविक नितीन थोरात, यांनी केले तर येश बनसोडे यांनी सूत्रसंचालन करीत वैभव इगवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी