उन्हाळी क्रीडा शिबिराची धूम - (२०२३)
ता- 23 एप्रिल 2023, मेरी मेमोरीयल हायस्कूल काष्टी (ढोकराई) ता. श्रीगोंदा (समापन सोहळा)
By : Polticalface Team ,01-05-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी) परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर विदयार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होते याच सुट्टीचा फायदा घेत. मेरी मेमोरीयल हायस्कूल मध्ये क्रीडा शिबिराचे आयोजन केले होते. आपली मुले काही नविन कौशल्य शिकतील त्यांच्या कला गुणांचा विकास होईल अशी पालकाची धारणा होती. त्यामुळे पालकांनी या उन्हाळी शिबिराला पसंती दर्शविली होती. कोरोना काळात मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना मैदानावर खेळण्याचे प्रोत्साहन मिळेल नविन मित्र मंडळीशी भेटीगाठी होतील त्यांचा शारीरिक व मानसिक विकास देखिल होईल. याच उद्देशाने मेरी मेमोरीयल हायस्कूल काष्टी शाळेच्या क्रीडांगणावर २४ ते २९ एप्रिल या तारखेस या भव्य शिबिराचे आयोजन केले होते.
काल दि. २९ एप्रिल रोजी क्रीडा शिबिराचा समापन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या भव्य सोहळ्याला, मेरी मेमोरीयल शाळेच्या अध्यक्षा - मा. रत्ना जॉन झकारीया, शाळेचे कार्यकारी अधिकारी - मा सालोमन जगले सर, शाळेच्या शिक्षण आ (C.E.O) - मा आशा जॉन झकारीया, शाळेच्या मुख्याध्यापिका - मा. योगिता साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपमुख्याध्यापिका शितल जगले, कोच निरीक्षक छाया मिस, लेरेसा मिस आणि सर्व शिक्षीका वर्ग तसेच कर्मचारी वर्गाने सदर कार्यक्रम सुशोभित करण्यात हातभार लावला. ह्या ६ दिवसीय शिबिरात मुलांकरीता, काष्टी शाळेने - स्कॉश, थ्रोबॉल, डॉजबॉल, झुंबा दौंड शाळेने - फूटबॉल, तर पाटस शाळेने - मार्शल, कराटे, खोखो, व्हॉलीबॉल खेळाचे आयोजन आपआपल्या शाळेनी केले होते. कोच म्हणून विश्वास भोसले, महेश माने आणि वरगडे सर यांची शाळेकडून निवड करण्यात आली होती. शाळेच्या सर्व मुलांना सहभाग पत्र व T-Shirt देऊन त्यांचे गुण गौरव करण्यात आले होते. अशा प्रकारे उन्हाळी शिबिराचा समापन सोहळा उत्साहात पार पडला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी