मेक इन इंडिया इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,01-05-2023
छ्त्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे)
गंगापूर तालुक्यातील मेक इन इंडिया इंग्लिश स्कूल गाजगाव या शाळेत 1 मे (महाराष्ट्र दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय पालक कमिटी अध्यक्षा श्रीमती कविता थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष राहुल औताडे व सचिव श्री.रवी पाटील झळके, पालक कमिटी अध्यक्षा श्रीमती कविता थोरात, सुनील थोरात,संदीप धुमाळ, सागर डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक :