कासुर्डी टोल नाका साक्षी हॉटेल समोर गुंडांचा राडा, प्रवाशांना शिवीगाळ मारहाण प्रकरणी आरोपी विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,03-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०३ मे २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी टोल नाका येथील साक्षी हॉटेल समोर,गाव गुंडांची दहशत दिवसेंदिवस अधिक वाढत चालली असल्याचे बोलले जात आहे, कासुर्डी टोल नाका येथील साक्षी हॉटेल समोर एका पिंकअप जीप मधिल प्रवासी चहा पिण्यासाठी थांबले असता, त्या वेळी निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाचे नाव हर्षद बाळू जगताप राहणार कासुर्डी कामटवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे, पांढऱ्या रंगाचा शर्ट असलेल्या इसमाचे नाव सागर माधव दोरगे, राहणारी यवत स्टेशन रोड तालुका दौंड जिल्हा पुणे, या दोघांपैकी हर्षद बाळू जगताप यांने पिकअप मधील प्रवासी यांना हाक मारुन तंबाखू मागीतली मात्र सदर इस्मानी कोनतेही उत्तर न दिल्याने त्यास शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करु लागले तेव्हा पिकअप गाडीतील इतर दोघेजण खाली उतरून भांडण सोडवण्यासाठी आले तेव्हा, आरोपी ने त्यांच्या गाडीतील कोयता हातामध्ये घेऊन दहशत निर्माण करत फिर्यादीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, तसेच, तेथे असलेली कुंडी हातात घेऊन, सागर दोरगे यांने पिकअप मधील फिर्यादीचे इतर मित्र व भावाला हातापायावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, निखिल यांच्या खिशातील मोबाईल फोन घेऊन फोडला व त्यांच्या खिशातील पैसे काढण्यासाठी सांगितले, मात्र निखिलने खिशातील पैसे दिले नाहीत त्यामुळे सदर आरोपींनी जबरदस्तीने पैसे मागण्यास सुरुवात केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, सदर घटना पुणे सोलापूर महामार्ग कासुर्डी टोल नाका साक्षी हॉटेल समोर दि,०१ मे २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजे दरम्यान घडली आहे, पिकअप मधिल प्रवासी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी, तुषार गणेश सुभेदार वय 28 वर्ष सध्या राहणार 231 गवळीवाडा खडकी बाजार मूळ राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद, यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दखल घेऊन, सदर आरोपी १) हर्षद बाळू जगताप,रा कासुर्डी कामटवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे, २) सागर माधव दोरगे रा यवत स्टेशन रोड तालुका दौंड जिल्हा पुणे, या आरोपींन विरुद्ध, गु र नं:-443/2023 भा.द.वि.क. 308,323,504,506, 341,386,34, भा.ह.का.क 4,25, फौज.का.(सुधा) अधि.1932 कलम 7 नुसार, दि ०१ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक मदने पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी