शिरूर श्रीगोंदा रोडलगत ढवळगाव शिवारात विहिरीत आढळला... पोत्यात बांधलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेह...

By : Polticalface Team ,04-05-2023

शिरूर श्रीगोंदा रोडलगत ढवळगाव शिवारात 
विहिरीत आढळला...

 पोत्यात बांधलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेह...
श्रीगोंदा प्रतिनिधी तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील ढवळगाव शिवारात शिरूर - श्रीगोंदा रोडलगत असणाऱ्या एका विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की,ढवळगाव जवळील एका कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे काहींनी पाहिले. याची खबर बेलवंडी पोलिसांना मिळाल्यानंतर बेलवंडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार सदर व्यक्ती ही अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाची असून एका पायाने अपंग आहे. मृतदेह शवविच्छेदनसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून अहवाल आल्यावर पुढील माहिती समजणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.बेलवंडीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहा. फौ.मारुती कोळपे,पो.कॉ. भाऊ शिंदे,पो. ना. गांगर्डे,पो.कॉ. शिपनकर,पो. कॉ. संदीप दिवटे, पो. कॉ. कदम,पो.कॉ. संपत गुंड, आदींनी भेट देऊन पाहणी केली.
बेलवंडी पोलिसांसमोर आव्हान...
या आधी देखील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अनोळखी, बेवारस, मृतदेह आढळून आले होते, आता पुन्हा एकदा अनोळखी मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका विहिरीत सापडल्याने त्याची ओळख पटवून गुन्ह्याचा उलगडा करणे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचेसह बेलवंडी पोलिसांना आव्हान असणार आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.