श्रीगोंद्यात खुनाचा प्रयत्न तलवार, कोयता, काठ्या, गज घेऊन एक किलोमीटर केला पाठलाग..! माने बंधू व मुलावर प्राणघातक हमला.

By : Polticalface Team ,04-05-2023

श्रीगोंद्यात खुनाचा प्रयत्न तलवार, कोयता, काठ्या, गज घेऊन एक किलोमीटर केला पाठलाग..! माने बंधू व मुलावर प्राणघातक हमला.
दिनांक ४ मे २०२३, श्रीगोंदा प्रतिनिधी:- शहरातील प्रसिद्ध उद्योजक व फुले आंबेडकर विचार मंच चे सक्रिय पदाधिकारी बापू माने यांच्यासह त्यांच्या मुलावर व भावावर काल दिनांक ३ मे २०२३ रोजी प्राणघातक हल्ला झाला. लिंपनगाव येथे घडलेल्या जमिनीच्या वादाचे पर्यावसन होऊन तेथे जमलेल्या जमावाने तलवार, काठ्या आणि गजाच्या सहाय्याने माने बंधू यांच्यावर हल्ला केला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले, लिंपण गाव पासुन एक किलोमीटरपर्यंत माने यांचा त्या प्रक्षोभक जमावाने पाठलाग केला. शिवाय ते घेऊन गेलेल्या TATA HARIAR गाडीवर ट्रॅक्टर घालून त्या गाडीचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
जमाव पाठलाग करताना जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या माने यांना एका स्विफ्ट चालकाने मदत केली. त्यावेळी ते श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोहोचले.

या घटनेनंतर बाप्पु माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार सात जनांवर भादवी कलम ३०७, ३२४, १४३, १४८, १४९, ४४७, ४२७ नुसार संतोष माणिक भोंडवे, सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदीप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, प्रविण सोपान कुरुमकर, सर्व राहणार लिंपनगाव, श्रीगोंदा व बापू लक्ष्मण कुरूमकर राहणार मुंढेकर वादी, श्रीगोंदा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बापू माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दिनांक ३ मे २०२३ रोजी दुपारी १२:३० वा. चे सुमारास मी, माझा मुलगा उदय बापू माने व भाऊ हनुमान बाबा माने असे आम्ही आमचे शेतात लिंपणगाव ता. श्रीगोंदा येथे माझी टाटा कंपनीची हेरी अर गाडी नं. एम. एच.१६ सी.क्यु.९७७९ हीन गेलो होतो. माझी गाडी आम्ही शेता लगत असलेल्या रोडला लावली त्यानंतर मी मुलगा, भाऊ असे जमीनीची पाहणी करत असतांना आमचे जमीनीत संतोष मानिक भोंडवे याने त्याचे कडील महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलाचा लाल रंगाचा ट्रक्टर चालवित घेवुन, आमचे दिशेने येवून आम्हाला जिवेठार मारणेचा उददेशाने आमचे अंगावर जोरात घेवुन आला. मी माझा जिव वाचविण्यासाठी शेताचे लगतचे खदानीचे वर पळत जावुन माझे वापरता मोबाईल मध्ये सदर घटनेची शुटींग काढलेली आहे. माझे सोबत माझा मुलगा व भाऊ हे मला वाचविण्यासाठी पळत आले असता ट्रक्टर चालक संतोष माणिक भोंडवे यांने सदरचा ट्रक्टर माझा मुलगा व भाऊ यांचे दिशेने वळवुन त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर संतोष मानिक भोंडवे याने त्याचे कडील ट्रक्टर माझे टाटा कंपनीची हरीअर गाडी नं. एम. एच. १६ सी.क्यु.९७७९ या गाडीवर घालून माझ्या गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान केले केले. त्यावेळी संतोश मानिक भोडवे याच सोबत असलेले सागर भिकाजी भोडबे, प्रसाद माणिक भाँडवे, संदिप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, सर्व रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर व बापु लक्ष्मण कुरुमकर रा. मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदमनगर असे आले. त्यावेळी किरण भिकाजी भोंडवे याचे हातात लोखंडी टांबी, संदिप किसन सुर्यवंशी यांचे हातात लोखंडी कोयता, सागर याचे हातात लोखंडी तलवार होती. वरील सर्व आम्हाला मारण्यासाठी आमचे मागे लागले. त्यावेळी किरण याने त्याचे हातातील टांबीने माझा भाऊ हनुमान याचे डावे हातावर मारून जखमी केले. प्रसाद मानिक भोंडवे याने त्याचे हातातील लाकडी काठीने माझे डावे हातावर व माझा मुलगा उदय याचे डोक्यात मारुन जखमी केले आहे. आम्ही आमचा जिव वाचविण्यासाठी पळत असतांना पुन्हा संतोष मानिक भोंडवे याने आमचे तीघाचे मागे सुमारे १ कि.मी. लिंपनगाव ते श्रीगोंदा जाणारे रोडवर ट्रक्टर जोरात चालून आम्हाला जीवे मारण्याचे उद्देशाने ट्रक्टर चालवितला. तसेच सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदिप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, सर्व रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर व बापु लक्ष्मण कुरुमकर रा. मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहदमनगर यांनी आंम्हाला मारण्या करीता दोन मोटार सायकलवर आमचा पाठलाग केला आहे.
आम्ही लिंपणगाव ते श्रीगोंदा रोडने श्रीगोंद्याकडे पळत असतांना रोडने येणारे एका स्वीफटकारने आम्हाला त्याचे गाडीत घेतले. त्यांचे नाव श्री. बाळु आप्पा नवले रा. बारामती असे असुन, ते मला ओळखत असल्याचे त्यांनी मला सांगीतले आहे. त्यानंतर मी माझा मुलगा व भाऊ असे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्या करीता आलो आहोत. म्हणुन माझी संतोष मानिक भोडवे, सागर भिकाजी भोंडवे, प्रसाद माणिक भोंडवे, संदिप किसन सुर्यवंशी, किरण भिकाजी भोंडवे, प्रविण सोपानराव कुरूमकर सर्व रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर व बापु लक्ष्मण कुरुमकर रा. मुढेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचे विरुद फिर्याद आहे. असे नमूद केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष