ढोकरी परिसरातील विजेची मागणी पाहता उजनीकाठ परिसरातील ढोकरी सब स्टेशनला मान्यता मिळाली,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

By : Polticalface Team ,04-05-2023

ढोकरी परिसरातील विजेची मागणी पाहता उजनीकाठ परिसरातील ढोकरी सब स्टेशनला मान्यता मिळाली,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 ढोकरी सबस्टेशनला मान्यता मिळाली असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यासाठी पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी पुढे सांगितले की करमाळा तालुक्यातील उजनीकाठचा भाग हा ऊस, केळी उत्पादन करणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील वीजेची मागणी व प्रत्यक्षात होणारा वीज पुरवठा यात तफावत होती. सन 2014 पासून आपण करमाळा मतदार संघासाठी वीजेच्या सुविधेबाबत सतत नवीन सबस्टेशनची विविध ठिकाणी निर्मीती व्हावी म्हणून मागणी करत आलो. वांगी परिसरात ढोकरी येथे 33/11 केव्हीए क्षमतेचे नवीन सबस्टेशन झाल्यास या भागातील वीजेचा प्रश्न कायमचा सुटला जाईल तसेच ढोकरी येथील नवीन सबस्टेशन मुळे जवळपासच्या इतर 33/11 केव्हीए सबस्टेशनवर असलेला अतिरिक्त भार कमी होणार आहे. यामुळे आपण सदर सबस्टेशन हे इन्फ्रा 2 मधून उभारले जावे अशी मागणी लावून धरली. या कामाचा आपण सतत पाठपुरावा करत राहीलो. या पाठपुराव्यास अखेर यश आले असून आर.डी.एस.एस या योजनेतून ढोकरी 33/11kva सब स्टेशनला मंजूरी मिळाली आहे. यापुढील कामकाजासाठी आपण महावितरणचे मयूर भरणे,कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनीअर विभाग )सोलापूर यांचेशी बोललो आहे. यानंतरच्या जागा उपलब्धता, निधी, उभारणी आदि कामासाठी आपण स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करणार आहोत. शेतकर्‍यांच्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सतत पुढाकार घेत आलो. वेळप्रसंगी शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करायला धजावलो नाही. आगामी काळात सुद्धा करमाळा मतदार संघातील वीजेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण शासनदरबारी आपली मागणी व त्यास पुरक पाठपुरावा करतच राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तर सन 2014 मध्ये माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा मतदार संघातील वीजेच्या प्रश्नांची कायमची सोडवणूक करण्यासाठी एक पायाभुत आराखडा तयार केला. यामध्ये 33/11 केव्हीए उपवीजकेंद्र, 220 केव्हीए वीजकेंद्र तसेच क्षमतावाढ करण्यासाठी 5 आणि 3 एमव्हीचे नवीन फिडर, एल टी लाईन, ट्रान्सफॉर्मर आदिंचा समावेश आहे. सदर आराखडा महावितरणच्या संचालक तसेच कार्यकारी संचालक यांचेकडेही सादर केला असून त्यानूसारच सर्व कामांचा पाठपुरावा आजही ते करत आहेत. सन 2015 मध्ये वांगी नं 1 येथे महावितरणच्या नवीन फिडर उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील यांनी ढोकरी येथे नवीन सबस्टेशन उभारण्याची संकल्पना जाहीर सभेत मांडली. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांनी पाठपुरावा चालू ठेवला व आता हा प्रश्न सुटल्याने अनेक शेतकरी माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष