लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ शेषराव नाना जाधव यांच्या गळ्यात ?
By : Polticalface Team ,04-05-2023
छ्त्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे)
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मराठवाड्यातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या बाजार समितीत डोणगावकरांच्या गेल्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यशस्वी झालेल्या आमदार प्रशांत बंब यांच्या यशात खारीचा वाटा नवनियुक्त संचालक शेषराव नाना जाधव यांच्या गळ्यात लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची माळ गळ्यात पडण्याची दाट शक्यता असून सध्या तालुकाभर तशी चर्चा गावागावात चावडी व पारावर बसून शेतकरी व ग्रामस्थ करत आहे.
दरम्यान शेषराव नाना जाधव हे गेल्या चाळीस वर्षांपासून बाजार समितीमध्ये संचालक म्हणुन निवडून येत आहे व 1999 तें 2005 यां कार्यकाळात शेषराव नाना जाधव यांनी उपसभापतीपदाची जबाबदारी लिलया यशस्वीपने सांभाळली आहे. त्यांना यामागे वेळोवेळी सभापती पदाच्या खुर्चीने कधी राजकारणात प्रचलित असलेल्या जातीयवादी राजकारणामुळे तर कधी वरिष्ठांनी शब्द देऊन फिरवल्यामुळे चकमा दिलेला आहे. मात्र यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीच्या युव्ह रचणेत आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलच्या यशाचे साक्षीदार स्वतः शेषराव नाना आहेत;कारण आमदार बंब यांच्या प्रत्येक सभा, बैठका, कॉर्नर बैठका यात आमदार बंब यांच्यासह स्वतःजातीने लक्ष घातले व न भूतो न भविष्यती असे यश निवडणुकीत मिळवले व अठरा पैकी तब्ब्ल 14 जागा संपादीत करून भाजप/शिवसेनेचा झेंडा बाजार समितीवर फडकवण्यात याशस्वी झाले यां सर्व यशाच्या राजकीय घडामोडीत शेसराव जाधव आ. प्रशांत बंब यांच्या मागोमाग सत्तातंर करण्यात किंगमेकर ठरले. मात्र आता आमदार बंब शेषराव जाधव यांच्यावर सभापतीपदाची धुरा सोपवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे; त्यात गेले चाळीस वर्ष राजकारणात दिर्घ काल यशस्वी ठरलेल्या व या निवडणुकीनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची मारुती मंदिरात शपथ घेतलेल्या शेषराव नाना यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ टाकणारच? कारण एकनिष्ठता ही शेषराव नाना जाधव यांची जमेची बाब असून बाजार समितीच्या राजकारणातील दीर्घ अनुभव व निवडून आलेल्या सर्व नवनियुक्त संचालकांत सर्वात जास्त अनुभवाची शिदोरी ही एक जमेची बाजू नानांची असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमदार प्रशांत बंब शेषराव नाना यांना न्याय देतील व सभापतीपदाची माळ त्यांच्याचा गळ्यात टाकतील यात वावगे काहि नाही,कारण आमदार प्रशांत बंब हे जातीय राजकारण कधीही करत नाही;कारण जातीय राजकारण करण्याचा पिंड आ. बंब यांचा नाही? हा आजपर्यंतचा इतिहास आहे; तरीही आमदार बंब यांच्या मनात काय प्लॅन आहेत हे येणारा काळच सांगेल!
वाचक क्रमांक :