करमाळा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ आमसभा घेण्याची पूर्व भागातील युवा नेते औदुंबर राजे भोसले यांनी केली मागणी

By : Polticalface Team ,05-05-2023

करमाळा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ आमसभा घेण्याची पूर्व भागातील युवा नेते औदुंबर राजे भोसले यांनी केली मागणी करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा तालुक्यातील जनतेच्या समस्या समजण्यासाठी तात्काळ आमसभा घ्यावी अशी मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे . सन 2015 पासून करमाळा पंचायत समितीने आमसभा घेतली नाही.आमसभा जनतेच्या समस्या सोडवण्याचे विचारपीठ असते.आमसभा न घेतल्यामुळे जनतेच्या हक्कावर गदा येत आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक गावी अधिकारी कर्मचारी हजर नाहीत.शेतकऱ्यांना सामान्य जनतेला छोट्या छोट्या कामासाठी करमाळा येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या सातबारा दप्तरवर नाव आडनाव याची चूक तलाठी करत आहेत.आणि दुरुस्त करण्यासाठी तहसीलदाराचा आदेश घ्या म्हणून सांगत आहेत. तो आदेश घेण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तहसील कचेरी मध्ये हेलपाटे मारावे लागतात.चूक तलाठी करणार आणि शिक्षा मात्र शेतकऱ्यांना ज्या तलाठ्याने ही चूक केली त्याच्यावर कार्यवाही करून त्याच्याकडून दुरुस्त करून घेतले पाहिजे.अवकाळी पावसाचे अनुदान अद्याप पर्यंत काही शेतकऱ्यांचे जमा झाले नाही.अनेक कारखान्याने ऊस बिल शेतकऱ्यांना दिले नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.विशेष म्हणजे तहसील कचेरी,पोलीस स्टेशन,कोर्ट,पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम कार्यालय,या सर्व शासकीय कार्याकडे जाणारा कॉटेज हॉस्पिटल ते जुना डाग बंगला ते नगरपालिका हा रस्ता अत्यंत खराब झाला असून,तालुक्याच्या दृष्टीने या रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील अनेक रस्ते नादुरुस्त आहेत त्या रस्त्याची कामे देखील होणे आवश्यक आहे.तहसील कचेरी व पोलीस स्टेशनची इमारत पावसाळ्यामध्ये गळत आहे.त्याची पण दुरुस्ती होणे गरजेचे आहे.ही इमारत शहरासाठी ऐतिहासिक ठेवा आहे.तो जपला पाहिजे.करमाळा शहरातील ऐतिहासिक किल्ला त्याचे देखील दुरुस्ती होणे गरजेचे आहे.उजनी ते सीना कोळेगाव प्रकल्प बोगदा या बोगद्याचे काम सन 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना,ते अध्यायापर्यंत झाले नाही.सीना नदीवर नेरले व आवाटी गावासाठी एक सिमेंट बंधारा पाटबंधारे कार्यालय मोडनिंब यांचे मार्फत मंजूर आहे परंतु अद्याप ते काम झाले नाही.सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी आवाटी नेरले आळसुंदे सालसे हिवरे हिसरे कोळगाव गौंडरे या गावांना कॅनल द्वारे दिले पाहिजे सीना कोळगाव प्रकल्पाचे पाणी या गावांना देण्यासाठी येथील जमीन खरेदी विक्री व्यवहार बंद आहे.खरेदी विक्री करण्यासाठी जिल्हा पुनर्वसन कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते.या आठ दहा गावांना पाणी द्यायचे आणि येथील अतिरिक्त जमिनी काढून प्रकल्पात बुडीत झालेल्या शेतकऱ्यांना द्यायच्या असा स्लॅब कायदा अमलात आणला आहे. परंतु कॅनल नादुरुस्त असे कारण सांगून आम्हाला पाणी नाही आणि त्यांना जमीन दिली नाही. खरेदी विक्री मात्र बंद आहे.याचा कोणी विचार करत नाही.अनेक सोसायटीचे सचिव हे गावी हजर न राहता सोसायटीच्या प्रारुप मतदार यादी मध्ये मूळ सभासद ज्यांचे दहा हजार रुपये,पंधरा हजार रुपये पन्नास हजार रुपये, तीन हजार रुपये,असे शेअर्स सोसायटीकडे जमा आहेत.अश्या सभासदांची नावे कमी करून नवीन बोगस बाहेरगावची बाहेर जिल्ह्यातील नावे समाविष्ट करून बोगस प्रारूप व अंतिम यादी तयार करतात व प्रसिद्ध न करताच प्रसिद्ध केल्याचे बोगस बनावट कागदपत्रे तयार करून, निवडणूक प्रोग्राम जाहीर करत आहेत.हे पूर्ण चुकीचे आहे. यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अशा अनेक समस्या तालुक्यामध्ये आहेत.आम्हाला जेवढ्या माहिती आहे.तेवढे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.उर्वरित सर्व समस्या पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी याना माहिती होण्यासाठी आमसभा घ्यावी.तालुक्यामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी देखील आहेत.त्यांचा सन्मान करणे व चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समाचार घेऊन विकास कामे मार्गी लागावीत एवढ्या उद्देशाने अशी लेखी मागणी पत्राद्वारे मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांच्याकडे आम्ही दिनांक 21/4/2023 रोजी केली आहे.त्या पत्रावर पंचायत समितीचे सभापती मा. अतुल भाऊ पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष मा. सतीशराव निळ,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.धनंजय डोंगरे,संचालक मा. नामदेव भोगे,मा.शहाजी ठोसर,पत्रकार मा. सुनील भोसले,मा.शंभूराजे फरतडे,मा.आण्णासाहेब सुपनवर वरकुटे ग्रामपंचायत सरपंच मा. दादासाहेब भांडवलकर मा. राजाभाऊ कदम, प्रहारचे मा.संदीप तळेकर, मा. आबासाहेब टापरे, मा. औदुंबरराजे भोसले अशा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष