बडवे इंजिनियरींग कंपनीला भीषण आग, सेक्शन जळून खाक

By : Polticalface Team ,05-05-2023

बडवे इंजिनियरींग कंपनीला भीषण आग, सेक्शन जळून खाक छ्त्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी योगेश मोरे ) दिनांक:04/05/2023 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन औद्योगिक वसाहतीतील बडवे इंजिनियरींग कंपनीला गुरूवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत कंपनीचे दोन सेक्शन जळून खाक झाले आहेत. पाच अग्निशमन दलाचे बंब व खासगी पाण्याच्या टँकरद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान आगीच्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याचे समजते. बडवे इंजिनियरींग कंपनीच्या नायगाव खंडेवाडी येथील प्लेटींग प्लांट मध्ये रात्री सात वाजेच्या दरम्यान आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनी व्यवस्थापनाने ईमरजन्सी सायरण वाजवून कामगारांना इशारा दिला. यामुळे कंपनीतून कामगार बाहेर पडल्याने जीवीतहानी झाली नाही. आगीत कंपनीचा प्लेटिंग प्लांट व अकाऊंट सेक्शन जळून खाक झाले. घटना समजताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, माळी, राठोड घटनास्थळी दाखल झाले. नायगाव-खंडेवाडी (गेवराई तांडा) येथील बडवे इंजिनिअरिंग प्रा.ली. कंपनीच्या बडवे इंजिनिअरिंग युनिट-02 या प्लेटिंग शॉपला (सायलेन्सर-दुचाकी) शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण शॉप जळाला असून आग इतकी भीषण होती की, प्लेटिंग शॉपच्या शेजारीच असलेल्या अकाउंट विभागाला सुद्धा आग लागली. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाचे बंब व सहा खासगी टँकर बोलावण्यात आले. परंतु कंपनीतील गँसचे सिलेंडर फुटल्याने आग भडकली. आग लागली तेव्हा कंपनीत १०० पेक्षा जास्त कामगार होते मात्र सुदैवाने आग भडकण्या अगोदर सर्वांना बाहेर पडण्यात यश आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी