पीपी. एल च्या फायनल मॅच प्रसंगी बक्षीस वितरण संपन्न
By : Polticalface Team ,05-05-2023
छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी योगेश मोरे)
दिनांक05/05/2023 रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पुरी येथे पी .पी .एल चा शेवटचा फायनल मॅच पूर्ण झाला. याप्रसंगी लोकप्रिय आमदार प्रशांत बंब यांच्याकडून प्रथम बक्षीस ३१०००/- देण्यात आले व द्वितीय बक्षीस २१०००/- सुमित रामेश्वरजी मुंदडा यांच्याकडून देण्यात आले. प्रथम पारितोषिक ढोरेगाव संघाला व द्वितीय पारितोषिक ढाकेफळ संघाला देण्यात आले;यावेळी सुमित रामेश्वरजी मुंदडा पंचायत समिती गंगापूर उपसभापती, गावातील सरपंच वंदना दादासाहेब राऊत, उपसरपंच संतोष सखाराम मोरे व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य. गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :