गंगापूर गटविकास अधिकारी मेहरबान? तर ४९ लाखाचा संडास गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक पहेलवान?

By : Polticalface Team ,05-05-2023

गंगापूर गटविकास अधिकारी मेहरबान? तर ४९ लाखाचा संडास गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक पहेलवान? छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी योगेश मोरे) मौजे पिंपळगाव दिवशी ग्रामपंचायत २०१७ ते २०२१ या कार्यकाळात तब्बल 49.08,000/- वैयक्तिक शौचालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नागरिक पंकज नन्नवरे यांनी दिलेल्या तक्रारी नूसार चौकशीत दोषी आढळलेले तत्कालीन ग्रामसेवक अे. के. शेख यांना घोडेगाव,सिद्धनाथ वाडगाव, बुट्टेवाडगाव,वडाळी (खोफेश्वर, मेंढी) आदी गावाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सन २०१७ ते २०२१ या कार्यकाळात गंगापूर पंचायत समितीद्वारे देण्यात आलेले वैयक्तिक शौचालय अनुदान परस्पर इतरांना वाटप प्रकरणी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच तत्कालीन गट विकास अधिकारी यांचा आवडता ग्रामसेवक अे.के. शेख यांच्या विरोधात वैयक्तिक शौचालय अनुदान आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विभागीय चौकशी अहवाल क्रं -3 नुसार ग्रामपंचायत पिंपळगाव दिवशी यांनी सन 2017 ते 2021 या वर्षात 409 वैयक्तीक शौचालयासाठी रु.49.08,000/- इतके SEM अंतर्गत प्राप्त झाले असुन सदर कामात खालील प्रमाणे अनियमितता आढळून येते.
1) स्वच्छ भारत मिशन वैयक्तीक शौचालय योजनेचे स्वतंत्र खाते ठेवलेले नाही.
2) लाभार्थीचे संमतीपत्र व अर्ज घेतलेले नाही. लाभार्थी स्वतः शौचलयाचे बांधकाम करीत नसल्यामुळे इतर व्यक्तीकडून शौचालयाचे बांधकाम केले आहे. यामुळे लाभार्थी यांना शौचालय अनुदान दिले नाही. शौचालय बांधकाम ज्या एजन्सीनी केले त्यांचे करारनामे व अदा केलेले प्रमाणके ठेवलेले नाहीत.
3) स्वच्छ भारत मिशन वैयक्तीक शौचालय योजनेवर प्रति लाभार्थी रु.12000/ रु. प्रमाणे 409 लाभार्थीचे संदर्भात रु.49,08,000/- निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा आहे. परन्तु शौचालयाची कामे केलेल्या एजन्सींना नेमक्या कोणत्या लाभार्थीचे अनुदान दिले याची माहिती ग्रामपंचायतीने ठेवलेली नाही. सदरील अभिलेखे ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामसेवक ए.के. शेख यांची असुन लाभार्थीचे संमतीपत्र न घेता परस्पर रक्कम दुस-या व्यक्तीच्या नावे देउन प्रशासकीय अनियमितता अनियमितता केली आहे. सदर अनियमिततेस ग्रामसेवक ए. के. शेख, तत्कालीन सरपंच सौ.गिता गणेश वावरे व इतरांच्या कार्यकाळात मोठा आर्थिक गैरव्यवहार ग्रामपंचायत पिंपळगाव ता. गंगापुर हे दोषी असून, त्याच्या विरुद्ध नियमाप्रमाणे काय कारवाई प्रस्तावित करण्यात आली असताना गट विकास अधिकारी गंगापूर यांनी भ्रष्ट ग्रामसेवक ए. के शेख यांना घोडेगाव,सिद्धनाथ वाडगाव, बुट्टेवाडगाव,वडाळी (खोफेश्वर, मेंढी) अशा मोठ्या गावाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असेल तर मग इतर ग्रामसेवका बाबत भेद भाव का करण्यात येत आहे.
शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी दि १३ एप्रिल २०२३ रोजी निवेदन दिले होते परंतु आज पर्यंत विद्यमान गटविकास अधिकारी गंगापूर यांनी कारवाई केली नसल्याने ग्रामसेवक अे. के शेख यांना अभय देत आहे की काय? असा सवाल शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी विचारला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष