आमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेताना आम्हीं शांत बसणार नाही-दिपक भाई केदार.
By : Polticalface Team ,06-05-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :-
कर्जत तालुक्यातील एका सामाजिक कार्यक्रमानिमित्त जातांना श्रीगोंदा येथे पदाधिकाऱ्यांशी संघटना व्याप्ती संदर्भात बैठक करून, स्थानिक पत्रकारांशी संवाद साधतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, सामाजिक न्यायासाठी अनुसुचित जाती जमाती उपाय योजनेचा स्वतंत्र बजट कायदा झाला पाहिजे.. या वर्षी १६४९४ कोटी रुपयांची घोषणा बजट मध्ये झाली.. मोठया निधीची नुसती घोषणा केली जाते. वास्तवात हा निधी पळवला जातो किंवा वळवला जातोय. कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, हरियाणा, पंजाब, राजस्थान राज्यात न्याय विभागाचा स्वतंत्र कायदा करून, Sc.. St आर्थिक सबलता देण्याचे कामं केले. ते पुरोगामी महाराष्ट्रात होत नाही. हे दुर्दैव आहे.. असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले.. आत्ता जन जागृती करून, लुटारुंचे बुरखे फाडणार यासाठी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी नमूद केले की, खेळाडू महीला न्यायाचा आक्रोश करत असताना ज्या जंतर मंतर ने देशाला आण्णा हजारे यांची ओळख करून दिली. त्या अण्णा हजारेनां महीला आंदोलकांचा आक्रोश दिसत नाही का..?, बिल्किन बानो, महीला पहिलवान, मनिषा वाल्मिकी अशा अनेक घटना घडतात मात्र, प्रधान मंत्री मन की बात मधे याबाबत काहीच बोलत नाहीत.
त्याचं बरोबर जय भीम घोषणा देणे गुन्हा आहे का..? लातूरच्या उमरगा कोठ गावात पोलीस निरीक्षक बंदुकीचा धाक दाखवून बाबसाहेबांच्या जयंतीची मिरवणूक रोखतो.. त्याचे निलंबन झाले पाहिजे.. अशीही त्यांनी मागणी केली. बारसू रिफायनरी आंदोलकांना ऑल इंडिया पँथर सेना पाठिंबा देत आहे.. नक्सलवादी , खलिस्तानी म्हणुन, आंदोलनांला चिरडण्याचा केन्द्र व राज्य सरकारची सवय आहे. असेही ते म्हणाले..
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केदार यांनी सांगीतले की, श्रीगोंदा तालुक्यात मागासवर्गीय, आदिवासीं समाजावर अन्यायाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तालुक्यांत आदिवासीं महिलांना नागडं करून मरण्याची भाषा वापरतात. ॲट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल झाला किंवा आग्रह केला तर, गैर संविधानिक आंदोलन करण्यात येतात.. हे गंभीर आहे. तसेच, तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी येथे केली आहे. बापू माने यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा दिपक भाई केदार यांनी निषेध केला असून, यातील आरोपी तात्काळ अटक करत. बापू माने यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अमर घोडके, तालुकाध्यक्ष संजय रणशिंग, नितिन शिंदे, योगेश गंगावणे, अक्षय आठवले, अभिजित सोनवणे, अनिल गंगावणे, विलास कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.