मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई. बेलवंडी पोलिसांकडून चार इसमांची सुटका.

By : Polticalface Team ,06-05-2023

मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई. 

 बेलवंडी पोलिसांकडून चार इसमांची सुटका.
श्रीगोंदा प्रतिनिधी :- तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करीत 4 इसमांची सुटका केली असून या कारवाईने वेठबिगारी करून घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,दोन दिवसांपूर्वी ढवळगाव नजीक एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेचा तपास करत असताना बेलवंडी पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहीती मिळाली की, श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यात काही इसमांच्या टोळ्या मानवी तस्करी करून त्यांना डांबून ठेऊन मारहाण करीत वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून घरचे व शेतातील काम करून घेत त्यांच्याकडून विविध रेल्वे स्टेशनवर भीक मागवून घेत आहेत. असे इसम मयत झाल्यानंतर त्यांना पाण्यात किंवा बेवारसपणे टाकून देतात. असे इसम काही विटभट्ट्यावर आणि शेतातील बागेत कामावर असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पीएसआय राजेंद्र चाटे आणि पोलिस कर्मचारी यांची स्वतंत्र तीन पथके तयार करून बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असताना खरातवाडी ता. श्रीगोंदा येथे पिलाजी कैलास भोसले याच्याकडे सलमान उर्फ करणकुमार रा. छत्तीसगड या इसमाची सुटका केली.घोटवी शिवारात बोडखे मळा येथे अमोल गिरीराज भोसले याच्याकडे ललन सुखदेव चोपाल रा. बिहार हा इसम मिळून आल्याने त्याची सुटका करण्यात आली. तसेच घोटवी शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि जंग्या गफूर काळे यांच्याकडील इसम भाऊ हरिभाऊ मोरे रा.अंबेजोगाई, बीड याची तावडीतुन सुटका करण्यात आली. या आरोपींना अटक करून अधिक तपास केल्यावर त्यांनी यापूर्वी एका इसमास सुरोडी येथील मारुती गबुललाल चव्हाण यास 5000 रुपयांस विकले असल्याचे सांगितले. सुरोडी शिवारात जाऊन खात्री करून शव श्रीश रा. कर्नाटक या इसमाची सुटका करण्यात आली आहे. सदर आरोपींच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात भादवि कलम 367,342,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई सदर ही मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर,मा.प्रशांत खैरे,अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामिण, श्री.अण्णासाहेब जाधव पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत, मा. कमलाकर जाधव पोलीस उपअधीक्षक, अर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मागदर्शनाखाली पो.नि. श्री. संजय ठेंगे, पो.स.ई.राजेंद्र चाटे, स.फौ. रावसाहेब शिंदे, स.फौ. मारुती कोळपे, पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर, पो.हे. कॉ. ज्ञानेश्वर पठारे, चा.पो.हे.कॉ.भाऊ शिंदे,पो.ना.शरद कदम, पो.ना.शरद गागंर्डे,पो.ना.नंदू पठारे , पो.ना.संतोष धांडे, पो.कॉ.विनोद पवार, पो. कॉ, कैलास शिपनकर, पो.कॉ.संदिप दिवटे, पो.कॉ.सतिष शिंदे,पो.कॉ,सचिन पठारे चा.पो.कॉ.सोनवणे, म.पो.ना.सुरेखा वलवे यांनी केली आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.