केंद्रीय मंडळाच्या नावाने राज्यात 800 हून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू? आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By : Polticalface Team ,06-05-2023

केंद्रीय मंडळाच्या नावाने राज्यात 800 हून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू? आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश (योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) राज्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या बोगस शाळांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तर राज्यात जवळपास आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या अनधिकृतपणे शाळांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोगस शाळांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहे. त्यामुळे आता बृहन्मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बोगस शाळांवर गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
केंद्रीय मंडळाच्या नावाने राज्यभरातील वेगवगेळ्या जिल्ह्यात आठशेहून अधिक शाळा अनधिकृतपणे सुरू आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी घेतली आहे. तसेच अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सोबतच राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या शाळांच्या वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देखील शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यातच आता अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशातील सूचना...
◆वैध कागदपत्रे नसणाऱ्या शाळांवर प्रचलित आदेश, शासन निर्णय, परिपत्रक तसेच संचलनालय स्तरावरून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे शाळा बंद करण्यात येणार?
◆आवश्यकतेप्रमाणे संबंधित शाळांवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे?
◆तसेच अशा अनधिकृत शाळांवर 7/12 वर बोजा चढवण्याची कारवाई केली जाणार?
◆विद्यार्थ्यांचे अन्य इतर शाळांमध्ये समायोजन करणे इत्यादी कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे़! राज्यातील काही शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांकडून शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करण्यात आला नाही़. त्यामुळे या संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ स्वतंत्र हस्तबटवड्याद्वारे शिक्षण विभागास सादर करावे.
◆संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक पुर्तता अहवाल तत्काळ सादर न केल्यास टास्क फोर्सकडून दाखल होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सहआरोपी करण्यात येणार.
शिक्षण क्षेत्रात खळबळ...
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यात अनधिकृतपणे शाळा चालवल्या जात आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत सुरु असलेला खेळ थांबवण्यासाठी आता शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार आता अशा बोगस शाळांविरोधात थेट कारवाई आणि गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर बोगस शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता किती शाळांवर कारवाई होते आणि गुन्हे दाखल केले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष