मेसच्या डब्याचे पैसे न दिल्याने चक्क समृद्धी महामार्ग बंद पाडला!
By : Polticalface Team ,06-05-2023
(योगेश मोरे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही तासापासून समृद्धी महामार्ग बंद पडला आहे. तर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जांबरगांव येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मेस पुरवणाऱ्या आणि चारचाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याने त्या संस्थेशी संबंधित लोकांनी टोल नाका बंद केला आहे. मुख्य रस्त्यावर वाहने आडवी लावल्याने टोल नाका पूर्णपणे बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर वाहनधारकांमध्ये मोठं संताप पाहायला मिळत आहे. मात्र संबधित कंपनीचे अधिकारी यावर काहीही बोलायला तयार नसल्याने काही वाहनधारकांनी वाद घालण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
वाचक क्रमांक :