मौजे वरवंड गावच्या हद्दीत हायवेवर, बेकायदेशीर जमाव जमवून हाणामारी प्रकरणी ९ इसमांन विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,07-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०६ मे २०२३ दौंड तालुक्यातील मौजे वरवंड गावच्या हद्दीत पुणे सोलापूर हायवेवर हाणामारी प्रकरणी फिर्यादी श्री कृष्णा विश्वनाथ सोनवणे वय २४ वर्ष रा. इंदापूर (गंगावळण) ता इंदापूर जिल्हा पुणे, यांच्या तक्रारीवरून आरोपी, १) केशव दिवेकर, २) तुषार उर्फ पप्पू पवार, ३) शरद दिवेकर, ४) शुभम दिवेकर, ५) विकास दिवेकर,६) राजेंद्र दिवेकर, ७) चैतन्य सातपुते, व इतर अज्ञात २ असे सर्व रा वरवंड ता दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गु,र.नं, 466 /2023, भा.द.वि.कलम 326, 143, 147, 149, नुसार दि,०५/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर हानामारीची घटना दि,०२/०५/२०२३ रोजी रात्रौ ८:३० वाजे, सुमारास घडली असुन बेकायदेशीर जमाव जमवून नेमके हनामारीचे कारण स्पष्ट नमूद करण्यात आले नाही.
मौजे वरवंड ता.दौंड जि.पुणे गावाच्या हददीत पुणे सोलापुर हायवेने सिध्दार्थ नगर कमानी समोर पुणे सोलापूर हायवे रोडवर हाणामारीत आरोपीने वापरलेले हत्यार लोंखडी गज, स्टिलचा राॅड, पी.व्ही.सी. प्लॅबिंगचा पाईपने मारामारीत, सतिश भानुदास सुर्यवंशी व श्री.कृष्णा विश्वनाथ सोनवणे, वय 24 वर्ष रा.इंदापुर (गंगावळण) ता. इंदापुर जि.पुणे, यांना बेदम मारहाण झाली, असल्याची खबर मिळताच यवत पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक नागरगोजे घटनास्थळी पोचले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हकीकत दि, ०२/०५/२०२३ रोजी रात्री ८:३० वा जे दरम्यान मौजे वरवंड ता दौंड जिल्हा पुणे, गावच्या हद्दीत फिर्यादी यांना डाव्या हाताचे पंजावर स्टीलच्या रोडने मारून फॅक्टर केले तसेच फिर्यादी यांचा मित्र सतीश भानुदास सूर्यवंशी यास लोखंडी गज स्टीलचा रोड पीव्हीसी प्लास्टिकच्या पाईपने सदर ९ आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून आपखुशीने दुखापत करून मारहाण केली, तसेच सतीश भानुदास सूर्यवंशी याच्या गळ्यातील सोन्याची चैन रोख रक्कम असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा माल या ठिकाणी पडुन गहाळ झाला असल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे, सदर मारामारी प्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार सहाय्यक फौजदार गाडेकर
व अंमलदार पोसई नागरगोजे पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी