जनता विद्यालयात राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रम संपन्न.
By : Polticalface Team ,07-05-2023
काष्टी ता.६
येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पंडित घोंगडे हे होते.
शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
तसेच यावेळी स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सर्वांनी मौन राखून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले , यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. दत्तात्रय पवार सर उपस्थित होते. कार्यक्रमावेळी कृष्णा
खामकर ,वैभव खामकर व इंद्रजीत भोसले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शिक्षकांमधून प्रा.श्री. विजयकुमार काकडे, सौ. जाधव यांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याची माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य घोंगडे यांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी ,सेवक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022- 23 वार्षिक निकाल पत्रकाचे वाटप करण्यात आले व उन्हाळी सुट्टीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समितीचे सचिव श्री हरिश्चंद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक राजू गावित यांनी केले.
वाचक क्रमांक :