भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा मृत्यू

By : Polticalface Team ,07-05-2023

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा मृत्यू छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी योगेश मोरे ) दिनांक 06/05/2023रोजी सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाने ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्यावरील इस्लामिक हॉटेलजवळ घडली. या भीषण अपघातात एक तरूण ठार झाला; तर दोन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अक्षय सतीश बडदे(१९) असे मृताचे नाव आहे. तर या घटनेत सद्दाम जैनी शेख (२०)आणि भगवान गोरे(२० सर्व रा. शेवगाव, जि. अहमदनगर)हे जखमी झाले आहेत.पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, शेवगाव येथील रहिवासी असलेली ही तिन्ही मित्र शनिवारी दुपारी त्यांच्या शेवगाव येथून मोटारसायकलने (क्रमांक एमएच १६डीबी ५६९८) छत्रपती संभाजीनगरला येत होते. केम्ब्रिज चाैक ते चिकलठाणा रस्त्यावर ते असताना त्यांच्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना उडवले. या भीषण घटनेत तिघेही ट्रकखाली आले. यात अक्षय आणि भगवान ट्रकच्या पुढील चाकाखाली आले. यात अक्षयच्या पोटावर चाक गेल्याने तो ऑन दी स्पॉट ठार झाला. तर भगवानचा पाय चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. तर सद्दाम हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून जखमी झाला.

अपघातास्थळा जवळील इस्लामिक हॉटेलमध्ये बसलेले लोक मदतीला धावले. रूग्णवाहिका बोलावून त्यांना घाटी रुग्णालयात रवाना केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रक आणि मृताची मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी