श्रीगोंदा सिद्धार्थ नगर येथे सामाजिक भावनेतून विविध उपक्रमाअंतर्गत बौद्ध धम्म सोहळा पार, कार्यक्रमात सामजिक ऐक्याचे दर्शन

By : Polticalface Team ,08-05-2023

श्रीगोंदा सिद्धार्थ नगर येथे सामाजिक भावनेतून विविध उपक्रमाअंतर्गत बौद्ध धम्म सोहळा पार, कार्यक्रमात सामजिक ऐक्याचे दर्शन दिनांक ७ मे २०२३, श्रीगोंदा : सिद्धार्थ नगर येथील सामजिक कार्यकर्ते यांनी धांगडधिंगा करण्याऐवजी सामाजिक भावनेतून विविध उपक्रमाअंतर्गत बौद्ध धम्म सोहळा पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. नियोजनबध्द केलेल्या या सर्व कार्यक्रमात सामजिक ऐक्याचे दर्शन घडले. समाज बांधवांनी २५६६ व्या बुद्ध पौर्णिमानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर, ध्वज वंदन, बौद्ध पूजापाठ, शुभेच्छा संदेश, शोभायात्रा, अन्नदान व शाहिरी जलसा असे कार्यक्रम यशस्वी केले. दिनांक ४ मे २०२३ गुरुवार पासून दिनांक ६ मे २०२३ शनिवार पर्यंत सलग तीन दिवस या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यास बहुसंख्य सामजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

» पहिल्या दिवशी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत बौद्ध पूजापाठाचा कार्यक्रम घेण्यात आला. शुभेच्छा संदेशांनंतर भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले... त्यात हृदय रोग, मधुमेह, स्त्री रोग, सोनोग्राफी, रक्त व बाल रोग तपासणी करून मोफत औषध देण्यात आली. यात ग्रामीण रुग्णालय, तालुका मेडिकल असोसिएशन व तालुका केमिस्ट असोसिशनने सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी साधरण दीड हजारांहून जास्त लाभार्थीनीं या शिबिराचा लाभ घेतला...

» दुसऱ्या दिवशी प्रतिमेचे पूजन करून, ध्वज वंदन केले, सकाळी शांततेत शोभा यात्रा काढण्यात आली, दुपारी अन्नदान करण्यात आले.

» तिसऱ्या दिवशी "एक निळा एक भगवा" फेम गायिका भारतीय महिला शाहीर सीमाताई पाटिल यांचा तुफान शाहिरी जलसा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून हजारो समाज बांधव व पदाधिकऱ्यांनी हजेरी लावली..

तीन दिवस आयोजित या विविध कार्यक्रमांत आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र दादा नागवडे (सह. सा. कारखाना चेअरमन), ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार व पदाधिकारी, घनश्याम अण्णा शेलार, ज्ञानदेव म्हस्के सर, नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी स्मितल भैया वाबळे, गौतम (आण्णा) घोडके, भागचंद घोडके (माजी नगराध्यक्ष), अशोक घोडके (चेअरमन, नवजीवन), माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, डॉ.ससाणे मॅडम, डॉ. अनिल घोडके, डॉ. ससाणे सर, डॉ. सचिन नवले, जंजिरे मॅडम, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. संदीप पाटील, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. निगार राजमहंमद सय्यद, डॉ. चंद्रशेखर घोडके, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. प्रशांत बोराडे, ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका व कर्मचारी सह एम डी शिंदे, अमर घोडके, राजेंद्र उकांडे, नितिन कांबळे, कुणाल शीरवाळे, नंदु ससाने, अविनाश मल्हाराव घोडके, विश्वास घोडके, आप्पा सोनवणे, दीपक राहूल घोडके, संदीप उमाप, अतिक कुरैशी, श्याम जरे, सतिश ओहोळ, प्रेरणा धेंडे, सुनिल ढवळे, साजण घोडके, राजु जगताप, वसंतराव नितनवरे, सह समाज बांधव मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिवाजी भानुदास घोडके, डॉ. प्रदिप घोडके (बौध्द धम्म यात्रा समिती, अध्यक्ष), रावसाहेब हरिभाऊ घोडके, भारत सखाराम घोडके (उद्योजक), शिवाजी आप्पा घोडके, गोरख तात्या घोडके, नवाज भाई शेख, प्रविण सुडगे, डॉ. अनिल घोडके सह बौध्द धम्म यात्रा समिती, सिध्दार्थ नगर, ससाणे नगर, व सर्व समाज बांधव श्रीगोंदा यांनी प्रयत्न केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.