गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,08-05-2023

गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी योगेश मोरे) छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुझ्या मुलांचे अपहरण करून पतीला मारहाण करून तुझा संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आरोपीने 33 वर्षीय विवाहितेला पाण्यात गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. संतापजनक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. मुख्तार खान उर्फ बब्बु (वय 42 वर्ष, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल परिसर) असे आरोपीचे नाव असून, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत 33 वर्षीय पीडितेने फिर्याद दिल्यानुसार, टाऊन हॉल भागात राहणारी पीडिता रस्त्याने येत जात असताना आरोपी मुख्तार आक्षेपार्ह कपडे घालून तिला अश्लील हातवारे करायचा. त्याच्याकडे पीडितेने दुर्लक्ष केल्यावर आरोपीने तिचा पाठलाग करायला सुरवात केली. त्यानंतर महिलेला गाठून तिच्या मुलांचे अपहरण व पतीला मारहाण करणे व तिच्याबद्दल चुकीची माहिती देऊन संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून विवाहितेला आरोपीने भेटण्यासाठी घरी येण्यास भाग पाडले.
दरम्यान पिडीत महिला जेव्हा घरी आली तेव्हा तिला मुख्तार याने तिला पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध टाकून प्यायला दिले. पाणी पिल्यावर महिला काही वेळाने अचानक बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत मुख्तार खानने पीडितेवर अनैसर्गिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनविला. तर पीडिता शुद्धीवर आल्यानंतर या कृत्याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
मुख्तारच्या कृत्याने पीडिता प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने याबाबत कुटुंबातील सदस्यांना कोणतीही माहिती दिली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या खचली असल्याचे पाहून, नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यामुळे मुख्तारच्या धमक्यांना न घाबरता महिलेच्या नातवाईकांनी तिला घेऊन शनिवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाणे गाठलं. तसेच महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी मुख्तार ऊर्फ बब्बू याच्याविरोधात 7 मे रोजी रात्री साडेबारा वाजता गुन्हा दाखल झाला. याची कुणकुण लागताच मुख्तार पसार झाला. दरम्यान, त्याच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बोर्ड असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कार्यालयही बंद दिसून आले. विशेष म्हणजे मुख्तार स्वतःला राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून वावरत होता. तर मुख्तार खान ऊर्फ बब्बू नावाचा आमचा पदाधिकारी नाही. तो कार्यकर्ता असू शकतो. मात्र, त्याला सध्याच्या कार्यकारिणीत कोणतेही पद दिलेले नाही. मागील कार्यकारिणीचे नेमके सांगता येत नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी दिली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष