सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव दुबई येथे संपन्न
नांदेडचा सप्तरंग गाजला दुबईच्या भारतीय दूतावास मध्ये
By : Polticalface Team ,08-05-2023
(योगेश मोरे प्रतिनिधी)
नांदेड येथील सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे होतोच! हा महोत्सव 2017 पासून आंतरराष्ट्रीय मंचावर देखील आयोजित होत आहे.मध्ये कोरोना काळामुळे विदेशात कार्यक्रम बंद झाल्यामुळे दोन वर्षानंतर यंदाचा सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव 2023 दुबई येथे भारतीय दूतावास ऑडिटोरियम मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्कृती मंत्रालय भारत सरकार, ग्लोबल बिझनेस फेडरेशन दुबई, क्लासिकल रिदम्स दुबई यांची साथ लाभली. सप्तरंग सेवाभावी संस्था दरवर्षी नांदेड आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा आयोजित करत असते; यावर्षी हा मान दुबईकरांना मिळाला. दुबईमध्ये अनेक भारतीय लोक असल्यामुळे आपल्या संस्कृतीचा जतन व कार्यक्रमाचे आवड तिथल्या लोकांना देखील आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारतातील 30 कलावंत व स्थानिक दुबई येथील 30 कलावंत यांनी संयुक्तरित्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलं. आजादी का अमृत महोत्सव आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस असे अनेक उपक्रम या कार्यक्रमाशी जोडण्यात आले.यामध्ये भारतीय संस्कृती संवर्धन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम दरवर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर आयोजित करत असतो असे प्रतिपादन प्रस्ताविक मध्ये डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केलं. भारतीय संस्कृती ही विविधतेत एकतेचा संदेश देणारी आहे व अनेक धर्म असून देखील भारतीय हा एक असून एका नावाखाली एक झेंडा खाली येऊन आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असतो व हीच संस्कृती विदेशात व अनेक भागात प्रसारित व्हावी व भारतीय संस्कृतीचे नावलौकिक व्हावे! या हेतूने सप्तरंग आंतरराष्ट्रीय महोत्सव विविध देशांमध्ये दरवर्षी आयोजन करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो; असे मत देखील सान्वी जेठवाणी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय दूतावास चे वाइस कॉन्सुल जनरल श्री उत्तम चंद, संस्कृती मंत्रालय भारत सरकारचे प्रोडक्शन ग्राउंड स्कीमचे सदस्य चंद्र प्रकाश, प्रजापिता ब्रह्मकुमारी, दुबईच्या संचालिका ब्रम्हकुमारी ज्योती बहन, ग्लोबल फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर भाटिया, इंडियन हायस्कूल दुबईचे ट्रस्टी श्री हेमनदास भाटिया, बैंक ऑफ बरोड़ा दुबई चे झोनल मैनेजर श्री विनय कुमार शर्मा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह व भारतीय शाल देऊन सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी व सचिव श्री अक्षय कदम यांनी केलं.
सदरील कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय नृत्य बॉलीवूड चे गाणे उपशास्त्रीय नृत्य लोकसंगीत लोक नृत्य असे अनेक कार्यक्रम उपस्थित मान्यवरांना पाहण्यास मिळाले भारतीय दूतावास मध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाल्याचे तिथले पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. खचाखच असं भरलेलं सभागृह विविध सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असे कार्यक्रम पुन्हा व्हावे आणि अनेकदा दुबईमध्ये याच कलाकारांना आम्हाला पहावयास मिळावं असे मत उपस्थित मान्यवर जाताना सर्व कलावंतांना सांगत होते.
या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजी नगर येथील ध्यास स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कलाश्री अकॅडमी, नांदेड येथील लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, बंगळुरू येथील कॉलेज स्टुडिओ, यातून भारतीय कलावंत निवडण्यात आले होते. खरंच भारतीय संस्कृती समानता आणि बंधुता वाढवण्याचे काम करत असते त्यामुळे अनेक विदेशातील लोकांना देखील भारतीय कार्यक्रम आवडतात व नांदेड मधील सप्तरंग आंतरराष्ट्रीय मंचावर देखील गाजत असल्याचे नांदेडकरांना सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओच्या माध्यमाने नांदेड येथील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपला शुभेच्छा पर संदेश पाठवला तेही या कार्यक्रमात दाखवण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्लासिकल रिदम्स दुबई येथील श्रीमती रोहिणी अनंत, सप्तरंग सेवाभावी संस्थेचे सचिव श्री अक्षय कदम, आयटीसी ट्रिप्स हॉलिडेज नांदेडचे श्री केदार नांदेडकर रितू धवन व अनेकांनी मेहनत घेतली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.