दौंड शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी, भुरटे चोरट्यांचा सुळसुळाट टू व्हीलर वरून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न

By : Polticalface Team ,08-05-2023

दौंड शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी, भुरटे चोरट्यांचा सुळसुळाट टू व्हीलर वरून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०८ मे २०२३ दौंड शहरातील भुरटे चोरट्यांचा सुळसुळाट नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे, शहर नागरिकांना निडरपणे वावरण्याची सुराणी राहिली नाही, अशी परिस्थिती दिवसांनदिवस वाढत चालली आहे, दि,०६/०५/२०२३ रोजी हुतात्मा चौकातून दौंड रेल्वे स्टेशन रोडने पाय चालत जात असताना,पाठिमागुन एक मोटार सायकलवर दोन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल वर बोलत चाललेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र सदर व्यक्ती सावध असल्याने हातातील मोबाईल सोडला नाही, उलट सदर भुरट्या चोरांना विरोध केला, या झटापटीत त्यांची मोटार सायकल पकडून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत असताना खाली फडफडत होता त्यामध्ये सदर व्यक्ती जमीनीवर सालटुन जखमी झाला. चोरटे मोटर सायकल वरून खाली पडल्याने एक जन पळुन गेला व दुसऱ्याला पकडण्यासाठी सदर व्यक्तीने आरडा ओरडा केला त्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी असलेल्या लोकवस्तील धरम उर्फ पप्पू हनुमंत बनसोडे हे धाऊन आले. मात्र तोपर्यंत चोरटे पळून गेला होता, मात्र त्याची नंबर नसलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल व त्यांच्या जवळील चाकू तेथेच पडलेला होता. सदर व्यक्ती व मदतीला धाऊन आलेले धरम उर्फ पंप्पू हनुमंत बनसोडे यांनी सदरची मोटर सायकल व पडलेला चाकू घेऊन दौंड पोलीस स्टेशन येथे जमा करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सदर घटनेची दखल घेतली, दौंड पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार यांनी वैद्यकीय यादी देऊन, औषध उपचार घेऊन, फिर्यादी सौरभ संतोष भंडारी वय २९ वर्ष रा गांधी चौक तालुका दौंड जिल्हा पुणे,यांच्या तक्रारीवरून दाखल अमलदार पो ना पानसरे यांनी भुरट्या दोन चोरट्यांन विरुद्ध दौंड पोलिसांनी गु. रजि नं ३७०/२०२३, भा.द.वी कलम ३९३,३४, नुसार अनोळखी व अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस साहाय्यक गोसावी पुढील तपास करीत आहेत, सदर घटना ०६/०५/२०२३, रोजी रात्री १०:३० वा जे दरम्यान दौंड शहरातील रेल्वे स्टेशन रोड हुतात्मा चौक येथे घडली असल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्याच बरोबर दौंड पोलीस प्रशासनाने शहरातील रात्री उशिरापर्यंत मोकाट फिरणाऱ्यांची दखल घ्यावी अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष