जगतापांच्या घाटात शेलारांच्या बैलगाड्याचा राडा बाळासाहेब काकडे

By : Polticalface Team ,08-05-2023

जगतापांच्या घाटात शेलारांच्या बैलगाड्याचा राडा 
बाळासाहेब काकडे श्रीगोंदा प्रतिनीधी :- श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे माजी आमदार राहुल जगताप यांनी रेणुकामाता या देवी च्या यात्रे निम्मत बैल गाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले या शर्यती जिंकणाऱ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान करून मोठ मोठी बक्षीस देण्यात आली आहेत असे राहुल जगताप यांनी सांगितले . बैल गाडा शर्यतीचे वेड आणि चाहते श्रीगोंदे तालुक्यात दिवसेंदिवस वाढू लागले आहे , जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी दहा लाखाला शर्यतीत धावणारा बैलजोडा घोडा गाडा घेतला असुन पिंपळगाव पिसा येथील रेणुका माता यात्रा उत्सवा निमित्ताने माजी आमदार राहुल जगताप यांनी आयोजीत केलेल्या बैल गाडा शर्यतीचे उद्घाटन आण्णासाहेब शेलारांच्या बैलगाडाने केले आहे. देवदैठण परिसरात बैलगाड्याच्या शर्यती पुर्वी पासून आयोजीत केल्या जात आहेत पण गेल्या वर्षी पासून माजी आमदार राहुल जगताप हे बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरले असुन पिंपळगाव पिसा हे बैलगाडा शर्यतीचे मुख्य आकर्षण ठरु लागले आहे त्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांच्या कडे शेतकर्यांचे आकर्षण वाढले आहे. सध्या शेतीला बैलजोडी पाळणे शेतकऱ्यांना परवडत नाही पण बैलगाड्या शर्यतीत आपला बैलगाडा उतरविणे आणि जिंकणे याचे वेड अनेक अथवा शर्यत प्रेमींना लागू लागले आहे या शर्यतीवर लाखोंची बक्षीसे ठेवली जात आहेत त्यापैकी बैलगाडा शर्यतीला वेगळे ग्लॅमर प्राप्त होऊ लागले आहे. आण्णासाहेब शेलार हेही बैलगाडा शर्यतीच्या प्रेमात पडले आहेत त्यांनी त्यांनी सोलापुर जिल्ह्यातून सहा लाखाची बैलजोडी संदीप बोरगे यांच्या पसंतीने खरेदी केली या बैरजोडीला दररोज पैलवाना प्रमाणे सकस आहार आणि आलिशान गोठ्यात आरामाची सोय करण्यात आली आहे पिंपळगाव पिसा येथील बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन , फॉर्चून अग्रो सोलुशन प्रा लि पुणे या कंपनी चे मालक व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे व राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे ,केशव मगर ,राजेंद्र नलगे ,दिपक भोसले ,झुंबर रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुकडी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निभोंरे यांनी 2 लाख 22 हजाराचे पहिले बक्षीस ठेवले आहे यावेळी अतुल लोखंडे मोहनराव आढाव मिलिंद भोयटे सुरजीत पवार मंगेश सुर्यवंशी मनोज इथापे संभाजी देविकर बाळासाहेब लगड नितीन डुबल अनिकेत शेळके आदि उपस्थित होते. या बैलगाडा शर्यतीत पुणे नगर सोलापूर नाशिक ठाणे जिल्ह्यातून सुमारे 500 बैलगाडे सहभागी झाले आहेत रविवारी या शर्यतीचा समारोप झाला आहे
बैलगाडा एक छंद
मी शेतकरी कुंटुबातील आहे देशी बैल गायीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे शर्यत हा एक कुस्ती प्रमाणे छंद आहे कुणाचा बैलगाडा कसा धावला कोणती बैलजोडी होती यावर चर्चा होते तसेच या शेतकऱ्याला बैलाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते त्यांना खुराक दररोज देऊन त्यांचे काळजी घ्यावी लागते म्हणूनच माजी आमदार राहुल जगताप यांनी आयोजीत केलेल्या बैल गाडा शर्यतीत एक नंबर येणाऱ्या शेतकऱ्याला बक्षीस 2 लाख 22 हजार 2 22 रुपयांचे बक्षीस देऊन शेतकऱ्याचा मान सन्मान करण्यात आला आहे .असे फॉर्चून अग्रो सोलुशन प्रा लि पुणे या कंपनी चे मालक व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक जालिंदर निंभोरे यांनी सांगितले तसेच भविष्यात श्रीगोंदे तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे प्रमाण वाढणार आहे असे ही निंभोरे बोलले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.