बोरिऐंदी आय टी आय, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांंना, चाकुचा धाक दाखवून किमती मोबाईल चोरट्यांनी पळावले
By : Polticalface Team ,08-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०८ मे २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोरिऐंदी आय टी आय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांंना चाकुचा धाक दाखवून तीन विद्यार्थींचे किमती मोबाईल अज्ञात चोरांनी पळवून नेले असल्याची खळबळजनक घटना दि ०८ मे २०२३ रोजी पुणे सोलापूर महामार्ग बोरिऐंदी फाटा या ठिकाणी घडली,
बोरिऐंदी येथिल आय टी आय सुटल्या नंतर यवत परीसरातील सहजपुर, कासुर्डी, यवत,भांडगाव, पारगाव, या भागातील आय टी आय विद्यार्थी बोरिऐंदी फाटा येथे घरी जाण्यासाठी आले असताना उरुळी कांचन बाजुंकडून चार इसम दोन मोटर सायकल वरुन आले त्या पैकी दोघे जण काही अंतरावर थांबले होते, तर दोन जनांनी थांबलेल्या विद्यार्थीना म्हणाले तुम्ही मुलींचे फोटो काढले आहेत बघु तुमचे मोबाईल असा खोटा आरोप करुन विद्यार्थ्यांवर दहशत निर्माण करून ७ ते ८ विद्यार्थ्यांचे मोबाइल घेवून मोबाईल मधील गॅलेरीत फोटो न पाहता मोबाईल खाली वर करून त्यातील साधे मोबाईल काही विद्यार्थ्यांना परत दिले व २५ ते ३० हजार रुपये किमतीचे असलेले मोबाईल चोरट्यांनी जवळ ठेवून घेतले, विद्यार्थ्यांनी मोबाईल मागीतले तेव्हा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत निळ्या पांढऱ्या रंगाची होंडा डिओ मोटर सायकल वरून चोर उरुळी कांचन बाजुकडे पळुन गेले असल्याची माहिती विद्यार्थीनी दिली.
हि घटना बोरिऐंदी फाटा येथे दि, ०८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५:४५ वा जे दरम्यान घडली आहे, त्या अनुषंगाने सदर विद्यार्थी यांनी यवत पोलीस स्टेशन गाठले, घडलेली सर्व हकीकत ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक मदने यांना सांगितली या संदर्भात तत्काळ दखल घेऊन विद्यार्थीसह घटना स्थळी चौकशी करण्यासाठी यवत पोलीस उपनिरीक्षक मदने रवाना झाले आहेत, बोरिऐंदी आय टी आय समोर पुणे सोलापूर महामार्गावरील आजुबाजुला असलेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये सदर मोबाईल चोर कैद झाले असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे, सदर प्रकरणी सखोल चौकशी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी