By : Polticalface Team ,09-05-2023
(योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदार प्रशांत बंब यांनी तब्बल 2300 गायी खरेदी केल्या असून, आणखी दीड हजार गाई खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे या गाई स्वतःसाठी नाही तर मतदारसंघातील बेरोजगार तरुणांसाठी खरेदी केल्या जात आहे. गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे आमदार तथा भाजप नेते प्रशांत बंब यांनी हा अनोखं उपक्रम सुरु केला आहे. आपल्या मतदारसंघातील तरुणाच्या हाताला काम मिळावे म्हणून, आमदार बंब यांनी आगळीवेगळी योजना राबवली आहे.
राज्यातच नव्हे तर देशभरात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. फक्त शहरच नव्हे तर गावागावात बेरोजगार तरुणांची फौज पाहायला मिळतेय. अशातच मराठवाड्यातील एका आमदाराने या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी ही मोहीम सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघातील गरजू तरुणांना त्यांनी प्रत्येकी 2 जर्सी गायी घेऊन दिल्या आहेत. त्यामुळे या दुग्ध व्यवसायातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण महिन्याला 20 ते 21 हजार रुपयांची कमाई करतायत.
आमदार बंब यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाला गीता बन प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. ज्यात एका शेतकऱ्याला दोन गायी देण्यात आल्या आहेत. एका गाईची किंमत 80 ते 90 हजार रुपये आहे. एक गाय दररोज 18 ते 20 लिटर दूध देते. त्यामुळे दोन गायींचे सुमारे 40 लिटर दूध मिळते. यासाठी अमूल डेअरी 27 रुपये लिटरप्रमाणे दूध विकत घेत आहे. 40 लिटरचे रोज 1480 रुपये मिळतात. ज्यात चारा, ढेप, सरकी, वैद्यकीय उपचार आदींसाठी दररोज 600 ते 700 रुपये खर्च लागतो. तो जाऊन महिन्याकाठी 20 ते 21 हजार रुपये उत्पन्न महिन्याला होणार आहे. ज्यातील दरमहा 10 हजार रुपये बँकेत जमा करून दीड वर्षात गाय शेतकऱ्याच्या मालकीची होईल.
◆आणखी 1500 गायी घेतल्या जाणार◆
आमदार प्रशांत बंब यांनी पहिल्या टप्प्यात पंजाबमधून 2300 गायी विकत घेतल्या आहेत. तसेच दिवाळीच्या वसुबारसपर्यंत आणखी 1500 गायी घेतल्या जाणार नाही. दूध विक्रीतून 750 तरुण स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याची माहिती बंब यांनी दिली आहे.
◆गायी देताना पाच अटींचा समावेश◆
◆लाभार्थी दुधाच्या व्यवसायात नसावा
◆त्याला किमान 1 एकर शेती असावी.
◆वासराला दररोज किमान 3 लिटर दूध पाजावे
शेतकऱ्यांच्या मुलांनाही मुबलक दूध द्यावे.
◆आणलेल्या गायींचे वय 2 ते 4 वर्षे आहे. त्या सरासरी 10 वर्षे दूध देतील. यानंतर भाकड गायी गोशाळेत पाठवणे बंधनकारक आहे.
◆योजना कौतुकास्पद ठरत आहे◆
एकीकडे तरुणांमध्ये बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात प्रचंड रोष आहे. अशातच आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरू केलेली योजना कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे जे बंब यांनी केलं, ते इतर आमदार ही करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष