ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

By : Polticalface Team ,09-05-2023

ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर (योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रतिनिधी) शहरातील सलीम अली सरोवर येथे मलजल प्रक्रिया केंद्राजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडली. अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे अशी मृतांची नावे आहेत. चेंबरमध्ये उतरलेल्या आणखी दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. खाजगी काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, चारही मजुरांना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे यांना मृत घोषित केले. तर दोघांवर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच मजुरांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. दोघांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. काही नातेवाईक सिटी चौक पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आहे.

चौघे उतरले होते चेंबरमध्ये अंकुश बाबासाहेब थोरात, रावसाहेब सदाशिव घोरपडे, विष्णू उगले आणि बाळू विश्राम खरात (सर्व रा. हिमायतबाग) हे मजूर कामानिमित्त ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते. काही वेळ काम केल्यानंतर अचानक श्वास घेण्यास मजुरांना त्रास होऊ लागला. यातच अंकुश थोरात आणि रावसाहेब घोरपडे या दोघांचा मृत्यू झाला. तर विष्णू उगले आणि बाळू खरात याची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी