राज्यस्तरीय धम्मरत्न पुरस्काराने भारत वानखेडे  तर भालेराव व गजभारे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान 
तुफान पावसाच्या तडाख्यात "बुध्द पहाट"ला जमली अलोट गर्दी 
                      
                
            
               By : Polticalface Team ,09-05-2023
       
               
                           
              नांदेड /प्रतिनिधी 
आकस्मिक होत असलेल्या तुफान पावसाच्या तडाख्याला न जुमानता चौदा वर्षांची धम्म परंपरा असलेल्या "बुध्द पहाट"या अभिनव बुध्द जयंतीच्या पारंपारिक सोहळ्यास नांदेडकरांनी अलोट गर्दी करुन पावसाच्या या तुफानावर मात करत बुद्ध व डॉ आंबेडकर यांच्या 
विचारांचे वादळ आज निर्माण केले
 
येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दरवर्षी प्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी १५ व्या बुध्द पहाट या ऐतिहासिक सांस्कृतिक अभिवादन सोहळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चरल मुहमेंट निर्मित प्रमोदकुमार गजभारे प्रस्तुत बुध्दपहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात आज पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते  मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्यअध्यक्ष भारत वानखेडे यांचा धम्म कार्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा २०२३ सालाचा राज्यस्तरीय धम्मरत्न तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक बापुराव गजभारे व सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता डी.डी.भालेराव यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर सौ. सविता शिंदे( सिडको अधिकारी) यांना रमाई पुरस्कार    विजय नांदेकर, गझल गायक ,) यांना भिमरत्न  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,आ.बालाजी कल्याणकर,मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे नेते राज्याध्यक्ष भारतजी वानखेडे,नवी मुंबई सिडकोच्या अधिकारी सौ.सविता शिंदे,विजय नांदेकर, बापुराव गजभारे,युवा नेते रवी गायकवाड, डाॅ.करुणा जमदाडे, डाॅ.उत्तम सोनकाबंळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भगवान बुध्द,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना पठण करण्यात आली.
बुद्धांची प्रज्ञा,शिल करूणेची शिकवन समाजाच्या कल्याणाच्या मार्ग- पोलीस अधीक्षक-कोकाटे
भगवान बुध्दांनी प्रज्ञा शील करुणेची दिलेली शिकवण मानवांच्या कल्यानाचा मार्ग दिला आहे या मार्गांचे आचरण करुन मन शुध्द करावे असे प्रतिपादन 
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले,
तर मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेचे नेते  भारत वानखेडे बोलतांना म्हणाले की, नांदेडकरांनी बुध्द जयंतीनिमित्त बुध्द पहाट सांस्कृतिक कार्यक्रमांचे बीज नांदेड मध्ये रोवले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत हे या कार्यक्रमाचे यश आहे आणि सलग पंधरा वर्ष सातत्याने कार्यक्रम होतो हे मोठं यश आहे.मी दुसऱ्यांदा येथे आलेलो आहे. नांदेडकरांच विशेष अभिनंदन करुन आम्ही मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना स्वर्णजडीत भगवान बुद्धांची मुर्ती भेट केली ते आज मुख्यमंत्री दालनात आहे. नांदेड मधुन करण्यात आलेली मागणी म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक सांस्कृतिक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे ही मागणी करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच महामंडळ होइल त्यातून कलावंतांसाठी विविध योजना सुरू होतील यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.आ.बालाजी कल्याणकर,बापुराव गजभारे, डॉ.करुणा जमदाडे यांनीही जयंती निमित्त धम्मबांधवांना शुभेच्छा देऊन बुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले.
मुख्य संगीतीक कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात बुद्ध-भीम गीत गझल गायक राहुल देव कदम यांनी भीम मोत्याचा हार माय, फाशी द्या असे गीताने चैतन्य निर्माण केले. प्रख्यात गायिका संगीता भावसार,नामदेव इंगळे,श्रीरंग चिंतेवारविजय नांदेकर गझल गायक यांनी  एकापेक्षा एक सरस सुमधुर गीत सादर करुन रसिक श्रोत्यांची दाद मिळवली, ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र केसकर यांच्या अभ्यासपुर्ण निवेदनाने रसिक प्रेक्षकांकडुन टाळ्यांचा पाऊस पाडला कार्य क्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठी दाद देत उदंड प्रतिसाद दिला यावेळी संगीत साथ सुरेख बासरी वादन शेख ऐनोदिन वारसी,तबला शिध्दोधन कदम,सुदाम गुनाले, किबोर्ड सिध्दार्थ सुर्यवंशी,महेन्द्र कदम,अॅक्टोपॅड राजेश भावसार,रतन चित्ते,यांनी संगीत साथ केलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक व  टी.पी.वाघमारे यांनी केले तर सुत्रसंचलन सुभाष लोणे यांनी करुन आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
निर्माता प्रमोदकुमार  गजभारे,संयोजन समिती अध्यक्ष रोहिदास कांबळे, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, सुभाष लोणे,उपाध्यक्ष आर. बी. मादळे,सचिव  टी.पी. वाघमारे,सहसचिव दिनेश सूर्यवंशी,कोषाध्यक्ष इंजि. भरत कुमार कानिंदे,
संघटक यशवंत कांबळे,सदस्य नंदकुमार कांबळे सिंदगीकर,उज्वला सुर्यवंशी (ऐडके),डी.एल. भिसे,बी.आर. धनजकर, वसंत दिग्रसकर,पंडीत आढाव, धर्मेन्द्र कांबळे, देविदास ढवळे,राजकुमार स्वामी, संजय रत्नपारखी ,भगवान गायकवाड, गजानंन कानडे,संघरत्न कोकरे,संजय बुक्तरे,अरुण केसराळीकर,बालाजी कांबळे, नागोराव ढवळे,दिलीप हनुमंते,प्रा.शुध्दोधन गायकवाड,प्रा.डॉ. जे.टी.जाधव,इंजि.वसंत वीर आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतल.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष