मामासाहेब हे वागणं बरं नव्हं पाठपुरावा करा पण संपूर्ण श्रेय घेऊ नका पाटील गटा कडून आमदार संजय मामा शिंदे गटाला मार्मिक टोला

By : Polticalface Team ,09-05-2023

मामासाहेब हे वागणं बरं नव्हं पाठपुरावा करा पण संपूर्ण श्रेय घेऊ नका पाटील गटा कडून आमदार संजय मामा शिंदे गटाला मार्मिक टोला करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 मामासाहेब हे वागणं बरं नव्ह, पाठपुरावा करा पण संपूर्ण श्रेय घेऊ नका असा मार्मिक टोला माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आमदार संजयमामा शिंदे यांना लगावण्यात आला. करमाळा तालुक्यातील विकासकामे ही नेहमीच श्रेयवादाच्या भोवर्‍यात गुंतलेली असतात. गौंडरे ता. करमाळा येथे 132/33 केव्हीए सबस्टेशनच्या सर्वेक्षणाचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले असल्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. यावर सदर कामाची मागणी ही सन 2016 मध्ये तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी केली असल्याचा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला. याबाबत सविस्तर माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की सन 2014 ते 2019 या कालावधीत करमाळा तालुक्यातील वीजेच्या पायाभूत सुविधांची पुर्तता करण्यात यावी म्हणून तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी महावितरणचे मुख्यालयात कार्यकारी संचालक (वितरण) म्हणून कार्यरत असलेले श्री संजय ताकसांडे यांना करमाळा मतदार संघात निमंत्रित केले. त्यावेळी श्री ताकसांडे यांचेकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसह पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी होती. करमाळा येथे पार पडलेल्या बैठकीत नारायण पाटील यांनी मतदार संघातील गरजेच्या भागात 33/11 केव्ही क्षमतेच्या उपवीजकेंद्राची, गौंडरे ता करमाळा येथे 132/33 केव्हीए क्षमतेचे आणखी एक वीजकेंद्र तसेच वीज वाहक लाईन्स, फिडर, ट्रान्सफॉर्मर, कामगार भरती आदि सर्व बाबींवर एक नियोजित आराखडा संचालक श्री ताकसांडे यांच्या कडे सादर केला होता. त्यावेळी इन्फा 1 ऐवजी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ही नव्या रुपात कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी मागणी केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला. यानूसार मग पुढे कामे होत राहिली. या कामांमध्ये गौंडरे येथील वीजकेंद्राचाही समावेश आहे. करमाळा येथील श्री ताकसांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीचे प्रोसिडींग अर्थात अहवाल महावितरणच्या बारामती विभाग कार्यालयातही उपलब्ध आहे. यामुळे मग आता माजी आमदार नारायण पाटील यांनी मागणी केलेल्या अथवा प्रस्तावित केलेल्या कामांना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने पुढील सर्वेक्षणाचे आदेश दिले असतील तर विद्यमान आमदार महोदयांनी या कामाचा पाठपुरावा जरुर करावा. परंतू मी नव्याने हे काम सुचवले आहे आणि यापुर्वी या कामाची कल्पनाही मागील लोकप्रतिनिधींच्या डोक्यात आली नाही असा गैरसमज निर्माण करु नये. सन 2014 ते 2019 दरम्यान करमाळा मतदार संघात वीजेची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. महत्त्वाचे म्हणजे अनेक कामे त्याकाळातच प्रस्तावित सुद्धा झाली आहेत. सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी या नात्याने या कामांचा पाठपुरावा जरुर करावा. गौंडरे ता करमाळा येथील 132/33 केव्ही क्षमतेच्या वीजकेंद्रासह अनेक प्रस्तावित कामे आहेत.महावितरणचे बार्शी सारखेच उपविभागीय कार्यालय जेऊर ता करमाळा येथे निर्माण झाले पाहिजे, जेऊर ता करमाळा येथे ट्रान्सफॉर्मर भवन कार्यान्वित झाले पाहिजे ही महत्त्वाची कामे माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रस्तावित केली आहेत. पण सन 2019 नंतर हि कामे रखडली असल्याची खंत तळेकर यांनी व्यक्त केली. तसेच अगदी काल परवा शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त करणारे आमदार संजयमामा शिंदे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे वीजेच्या कामाचा पत्रव्यवहार केल्याची माहिती देत असल्याने आश्चर्य वाटले असा टोलाही प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष