यवत पोलीस स्टेशन हद्दीतील आठ सराईत गुन्हेगारांना सहा महिने तडीपार करण्याचे आदेश, अधिक्षक अंकित गोयल
By : Polticalface Team ,10-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०९ मे २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत मानकोबावाडा येथील सराईत गुन्हेगार १)अक्षय लालु लकडे, २) शुभम बाळू लकडे, ३) बाळू उर्फ भाऊ आबा लकडे, ४) विशाल नंदू खताळ, ५) सागर ठकू खताळ, ६) खंडू धनाजी ठोकळे,७) रोहित गोपीनाथ गवळी, सर्व राहणार यवत मानकोबावाडा तालुका दौंड जिल्हा पुणे, ८) गौरव नामदेव अवचर, रा उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे, या सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध, ०६ महिने तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे, यवत पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे सदर इसमांन विरुद्ध दाखल आहेत, या सराईत गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारांची टोळी तयार करून, यवत परीसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवून, गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारीचे कृत्य करीत होते, त्यांच्या विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे वेळोवेळी कारवाई करूनही त्यांचे गुन्हेगारी वर्तनात कोणताही फरक पडला नाही, त्यामुळे सदर आरोपींचे गुन्हेगारी कृत्यास कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी, या गुन्हेगारी टोळी विरुद्ध, म पो का क ५५ प्रमाणे कायदेशीर, हद्दपार करण्या बाबतचा प्रस्ताव यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना सोनल शिंदे यांनी तयार करुन, उपविभागीय पोलीस अधिकारी मा, राहुल धस यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक मा,अंकित गोयल, यांना सादर करण्यात आला होता, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मा,अंकित गोयल, यांनी सदर इसमांन विरुद्ध दिनांक ०६/०५/२०२३ रोजी संपूर्ण पुणे ग्रामीण, जिल्हा पिंपरी, चिंचवड, आयुक्तालयासह, सातारा, जिल्ह्यातील फलटण, तालुक्यासह ०६ महिन्यांच्या कालावधी पर्यंत, सदर इसमांना तडीपार करण्यात आले असल्याचा आदेश देण्यात आला आहे, सदरचा आदेश लागु झाल्या पासून, सदर इसमांनी वरील जिल्ह्या व तालुक्या मधुन तडीपार करण्यात आले आहे, सदरचे इसम हद्दपार झालेल्या तालुक्यात दिसुन आल्यास, यवत पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा,अंकित गोयल पुणे ग्रामीण, मा, आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती पुणे ग्रामीण, मा,राहुल धस उपविभागीय अधिकारी दौंड, यांच्या मार्गदर्शनाखाली, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, पोहवा महेश बनकर, यवत पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई विठ्ठल जगताप सह, फौजदार जी डी भोसले, पोहवा गुरु गायकवाड, पोहवा राम जगताप, पो हवा चांदणे, मपोना सोनल शिंदे, पो ना प्रकाश झैंडे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाराते, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जायभाय यांनी केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी