राहु हद्दीतील थोरली विहीर येथे जमीनीच्या वादातुन तुफान हाणामारी यवत पोलीस स्टेशन येथे ८ इसमांन विरुद्ध गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,10-05-2023

राहु हद्दीतील थोरली विहीर येथे जमीनीच्या वादातुन तुफान हाणामारी यवत पोलीस स्टेशन येथे ८ इसमांन विरुद्ध गुन्हा दाखल
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १० मे २०२३ यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे राहु हद्दीतील थोरली विहीर या ठिकाणी जमीनीच्या वादातुन संख्या भावा भावात तुफान हाणामारी प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ पुनम रायबा शिंदे वय ४२ वर्ष व्यवसाय नोकरी रा चासकमान कॉलनी मलठण फाटा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे आरोपी १) आप्पा दत्तात्रय शिंदे, २) सौ मंदा आप्पा शिंदे, ३) ज्योती आप्पा शिंदे,४) निशा अप्पा शिंदे ५) प्रिया अप्पा शिंदे, ६) सुभाष कांतीलाल बनकर, ७) विनायक रामदास खेडेकर, ८) प्रवीण रामदास खेडेकर, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटना मौजे राहु गावच्या हद्दीत थोरली विहीर येथे दि,०६/०५/२०२३ रोजी सकाळी ११ वा जे सुमारास घडली, फिर्यादी व त्यांचे पती रायबा शिंदे आणि मुलांना गंभीर मारहाण व दुखापत झाली असल्याने सदर कुटुंब आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली अति दक्षता विभाग औषध उपचार घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर ५७४-- ५७४/१ जमिनीवर आरोपी दिर आप्पा दत्तात्रय शिंदे यांनी अतिक्रमण केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे, या संदर्भात गेली अनेक वर्षापासून वादविवाद असल्याने यवत पोलीस स्टेशन येथे आपसात एकमेका विरुद्ध तक्रारी आहेत, मात्र या संदर्भात अद्याप वाद विवाद संपुष्टात येणे शक्य झाले नाही, अखेर दि,०६ मे रोजी फिर्यादी त्यांच्या शेतात नांगरट करत असताना पुन्हा एकमेकांच्यात वादविवाद निर्माण झाले त्या वेळी आरोपी आप्पा दत्तात्रय शिंदे यांनी फोन करून त्यांचे भाचे व इतर ४ ते ५ लोकांना बोलावून बेकायदेशीर जमाव जमवुन, लोखंडी गज कुऱ्हाड काठ्याने तुफान हाणामारी झाली तसेच आरोपींनी ट्रॅक्टर व कार नंबर एम एच १२ --१०३६ या वाहनांची तोडफोड करुन दगडफेक करत लोखंडी गज व काठ्यांनी आणि लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली त्यामध्ये फिर्यादीचे पती रायबा शिंदे यांचे डाव्या हाताचे दंडात फ्रॅक्चर झाला असून, डोक्यात जबर मार लागला आहे, तसेच मुलगा विपुल शिंदे यांचे डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत होऊन जखमी झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे, सदर प्रकरणी आरोपी आप्पा दत्तात्रय शिंदे, व विनायक रामदास खेडेकर यांना दौंड न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने सुनावले आहे, सदर प्रकरणी यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा संतोष कदम, पुढील तपास करीत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष