पेडगाव येथील बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,10-05-2023
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मेडिकल डिग्री नसताना रुग्णावर उपचार करत आल्याची तालुका आरोग्य अधिकारी यांना मिळताच त्यांनी आपल्या टीमसह अचानक छापा मारून बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बोगस आरोपीला जेरबंद केले आहे
श्रीगोंदा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना तालुका आरोग्य अधिकारी नितीन मारुती खामकर, धंदा - नोकरी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, श्रीगोंदा यांना गुप्त महितीदाराकडून ८ मे रोजी ४ चे सुमारास पेडगाव या ठिकाणी कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना रुग्णावर एक बोगस डॉक्टर उपचार करत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली असता काल दि ८ मे रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी व त्याचा वैद्यकीय स्टाफ मध्ये राहुल महामुनी व समीर कुलकर्णी असे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, श्रीगोंदा याना सोबत घेऊन अचानक पेडगाव या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी पेडगाव, ता. श्रीगोंदा गावामध्ये इसम नामे राहुल अरोविंदु बिश्वास, रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर हा त्याचेकडे कोणताही परवाना अथवा डीग्री नसताना बेकायदेशीर रित्या पेशंटवर वैदयकीय उपचार करत आहे. व त्याचे कब्जात औषधे, सलाईन, गोळ्या, सिरप, इंजेक्शन व स्टेरॉईड्स बाळगुन आहे. असी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक समिर अभंग व पोलीस स्टाफ यांना मदती करीता घेतले. तालुका आरोग्य अधिकारी
व वैदयकीय स्टाफ, पोलीस स्टाफ व पंच असे श्रीगोंदा पोलीस ठाणे येथुन खाजगी वाहनाने निघुन पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे मिळालेल्या माहीतचे ठिकाणी जावुन रस्त्यावर गाडया उभ्या करुन जनकल्याण क्लिनीक दवाखाना असा फलक लावलेले पत्याचे खोलीत अचानक ६ वाजता आम्ही वैदयकीय स्टाफ, पोलीस स्टाफ व पंच अशांनी जावुन सदर ठिकाणची पाहणी केली असता सदर खोलीमध्ये तीन खाटा दिसत असुन एका खाटेचे चारही बाजुने पडदे लावलेले दिसले. सदर खोलीचे दरवाजा समोर टेबल व खुर्ची दिसली व सदर ठिकाणी एक इसम बसलेला दिसला.सर्वानी त्यास ओळख करुन देवुन करत असलेल्या कारवाईचा उददेश समजावुन सांगीतला. सदर इसमाकडे वैदयकीय पदवीची व कागदपत्रांची मागणी केली असता त्याने बी.ई.एम.एस, डी.ई.एच.एम व ऍक्युपंक्चर रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट दाखविले. परंतु तो बातमीतील माहीती प्रमाणे ऍलोपॅथी औषधोपचार करत असल्याचे निदर्शणास आल्याने सदर ठिकाणची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे टेबलवर, व खोलीतील बॉक्समध्ये अनेक प्रकारची इलोपॅथिक औषधे मिळून आली आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना बोगस उपचार करत असल्यामुळे पोलिसांनी त्या तोतया डॉक्टर ला ताब्यात घेऊन तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांच्या फिर्यादीवरून राहुल अरोविंदु बिश्वास, रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांचेवर भादवि ४१९ ४२० तसेच भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम १९५६ चे १५ (२)व भारतीय वैद्यकीय परिषद १९६१ चे अधिनियम ३३ ते ३३अ व ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.