रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीवर राहुल जगताप यांची निवड.
By : Polticalface Team ,10-05-2023
श्रीगोंदा प्रतिनीधी :-
श्रीगोंदा - नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल बाॅडी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याला मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीवर सदस्यपद भुषविण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्याला मिळाली आहे .
मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीवर सदस्य म्हणून यापुर्वी बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांनी काम केलेले आहे.
राहुल जगताप यांना मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीवर सदस्य म्हणून मान मिळाला आहे यामुळे राहुल जगताप यांच्या कामाला वेगळी झळाळी येणार आहे.
माझी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या माध्यमातून रयत शिक्षक संस्थेत मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेतील सेवक आणि महाविद्यालय विद्यालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणार आहे अशी माहिती राहुल जगताप यांनी दिली.
वाचक क्रमांक :