दौंड नगरपरिषदेतर्फे पीएमस्वनिधी लाभार्थ्यासाठी, स्वनिधी से समृद्धी कॅम्पचे यशस्वी आयोजन

By : Polticalface Team ,10-05-2023

दौंड नगरपरिषदेतर्फे पीएमस्वनिधी लाभार्थ्यासाठी, स्वनिधी से समृद्धी कॅम्पचे यशस्वी आयोजन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड: ता १० मे २०२३, दौंड नगर परिषदे मार्फत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवले जाते. केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी ही योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत दौंड शहरातील ७७६ पथविक्रेत्यांचे अर्ज शहरातील विविध बँकामध्ये पाठवण्यात आलेले आहेत त्यामधील ६२१ अर्ज बँकांनी मंजूर केलेले असून ५५५ लाभार्थ्याना कर्जाचा लाभ देण्यात आलेला आहे. सदर योजनेंतर्गत तीन टप्पे असून प्रथम कर्ज १० हजार, द्वितीय कर्ज २० हजार, तृतीय कर्ज ५० हजार अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना व्याजात सवलत उपलब्ध आहे. खेळते भांडवल कर्ज स्वरूपात घेऊन त्याचे वेळोवेळी हप्ते भरल्याने, पथविक्रेत्यांची बँकेकडे पत तयार झाली आहे. इथून पुढे वेळोवेळी हप्ते भरल्यास पुढील कर्ज मिळणे सोयीचे होणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “स्वनिधी से समृद्धी” योजनेंतर्गत ४२४ लाभार्थ्यांची प्रोफाईल तयार करण्यात येणार आहे. त्यापैकी ६१ लाभार्थ्यांची प्रोफाईल तयार करण्यासाठी सदर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते. या कॅम्पमध्ये दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले यांनी पथविक्रेत्यांना “स्वनिधी से समृद्धी” योजनेबाबत मार्गदर्शन केले. नियमित कर्ज परतफेड केली तरच बँकेकडे पथविक्रेत्यांची पत तयार होईल आणि योजनेचा तिसरा टप्पा परिपूर्ण होईल असे आवाहन केले. “स्वनिधी से समृद्धी” योजनेंतर्गत लाभार्थ्याना केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले परिचय बोर्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. दीपक म्हस्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव, वसुली विभागाचे हनुमंत गुंड, शहरसमन्वयक शुभम चौकटे, विजय नरड, प्रकाश वेलफुलवार आदींनी परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी