दौंड शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा
By : Polticalface Team ,11-05-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ११ मे २०२३ रोजी दौंड
शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार,मा ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन, वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका अध्यक्ष मा अश्विन भाऊ वाघमारे, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते,
फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील दौंड शहर व ग्रामीण भागातील विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, दौंड पोलीस स्टेशन समोर संत गाडगे महाराज व संविधान चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, वृक्ष लागवड, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे फ्लेक्स बोर्ड लावून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला, असल्याचे दौंड तालुका अध्यक्ष अश्विन भाऊ वाघमारे यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी दौंड शहरातील विविध क्षेत्रातील पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, शहरातील तरुण युवक एकत्रित येऊन ढोल ताशाच्या गजरात जंगी रॅली काढण्यात आली, या वेळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, दौंड पोलीस स्टेशनच्या समोर संत गाडगे महाराज व संविधान चौकात जनसमुदाय एकवटला होता, या प्रसंगी रॅलीचे स्वागत मोठ्या जल्लोषात व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आले, सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी प्रामुख्याने दौंड शहरातील भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजगुरू बुद्ध विहार या प्रमुख व जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, त्याच प्रमाणे अजिंक्य भाऊ गायकवाड तालुका सचिव, रमेश जी तांबे तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष सैफभाई मणियार, शहर उपाध्यक्ष टोनी अद्रस, भीमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी भाऊ वाघमारे, शहर सचिव राहुल नायडू, शहर महासचिव, अक्षय शिखरे, शहर सचिव सोहन शिंदे, शहर संघटक बबलू जगताप, शहर संघटक शिवा खरारे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पोते, शुभम वानखेडे, अनिकेत जाधव, अभी मोरे, प्रेम चव्हाण, शहर संघटक दीपक सोनवणे, रितेश सोनवणे, आकाश गायकवाड, प्रवीण भालेराव, करण खांडे, सुमित शिंदे, सूमित सोनवणे, सुरज जगताप, राजेश ओहाळ, विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते,
प्रा.बी.वाय.जगताप सर, प्रा.भीमराव मोरे, आरपीआय नेते भारत सरोदे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष नागसेन धेंडे, माजी मंडल अधिकारी श्रीकांत शिंदे, राजगृह बुद्ध विहार चे राजेश मंथने व अश्विन वाघमारे, मा. दिलीप पगारे, पत्रकार रमेश चावरिया इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत उपस्थित बांधवाना येणारा पुढील काळ वंचितांसाठी चांगला असल्याचा संदेश देऊन जल्लोष निर्माण केला, तसेच
या स्वाभिमानी नेत्यांच्या वाढदिवसा निमित्ताने, स्वाभिमानी दिन म्हणून सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने वंचित ला ताकद द्यावी अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुकाध्यक्ष अश्विन भाऊ वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अंतिम वेळी उपस्थित मान्यवरांना दूध कोल्ड्रिंकचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दौंड शहरातील वंचित बहुजन आघाडीचे,भीमक्रांती सेना, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, तसेच उमेश नडगमकर सर, विपुल वाघमारे,अतितोष वाघमारे, गौरव शिंदे,अनिकेत वाघमारे, दादू वाघमारे, सोन्या वाघमारे, अमित- सुमित वाघमारे इत्यादी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.असल्याची प्रतिक्रिया दौंड तालुका अध्यक्ष अश्विन भाऊ वाघमारे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.