By : Polticalface Team ,12-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने तीन-चार दिवसापूर्वी शेतकऱ्याच्या कांद्याला एक रूपये पाच पैसे भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याचा अंत्यविधी केला होता. कांद्याचे अंत्यविधी अन् दहावा मुंडन यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ७ रूपये किलो प्रमाणे भाव मिळाल्यानंतर पुढील १३व्याचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे!
गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांद्याचा दशक्रिया विधी करून मुंडण करून आंदोलन केल्याने त्या कांद्याला योग्य भाव गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी गणेश गणगे यांच्या कांद्याला एक रुपये पाच पैसे दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत गेट समोरच कांद्याचा अंत्यविधी केला होता. या कांद्याला आठ रुपये भाव घ्यावा नसता कांद्याच्या दशक्रिया नंतर मुंडन करून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता; 12 मे रोजी सकाळी साडेबारा वाजच्या सुमारास मुंडन करण्यात आले. गंगापूर कुऊबा प्रशासनाच्या वतीने आंदोलन करत्या शेतकऱ्यांना ७ रूपये भाव देण्यात आल्याने व यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही! याची दक्षता बाजार समिती घेईल; या लेखी आश्वासनाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, इंजी.महेशभाई गुजर, संपत रोडगे, गणेश गंनगे ,बाळासाहेब जाधव, संकेत मेराळ, भाऊसाहेब गवळी, सुनील बोराटे, देविदास पाठे व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होती.